करमाळा

रामवाडी रेल्वे भुयारी मार्गाचे उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रामवाडी रेल्वे भुयारी मार्गाचे उद्घाटन

केतूर (अभय माने):  पुणे सोलापूर लोहमार्गावरील जिंती रोड रेल्वे स्टेशन नजीक असणारे रामवाडी (ता. करमाळा) येथील रेल्वे गेट नं २५ भुयारी रस्ता काँक्रेटीकरण व बाजूच्या भिंतीच्या एकूण एस्टिमेटेड किंमत १ कोटी २३ लाख रुपये मंजूर होऊन सादर रस्त्याचे काँक्रेटीकरणचे काम पुर्ण होऊन बाजूच्या भिंतेचे काम काही दिवसात पुर्ण होणार आहे. सदर रेल्वे गेट सोलापूर-नगर व पुणे या तीन जिल्ह्याच्या बॉर्डर वर असून सद्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे सदर रस्त्याचा शुभारंभ मा. खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

या कामी डी.आर.एम. निरंजनकुमार दोहरे साहेब ,सिनिअर डी.इ .एन चंद्रभूषण साहेब, डी. आर.एम साहेबांचे सचिव ताजुद्दीन हुडेवाले साहेब यांचे सहकार्य लाभले. सदर भुयारी रस्ता काँक्रेटीकरण झाल्यामुळे सदर रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. 

सदर समारंभास जि. प .सदस्य सौ. सावितादेवी राजेभोसले, बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे , मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ लाकडे , शिवाजी राखुंडे, खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव डूबल तसेच सुहास गलांडे, राजेंद्रे धांडे ,मनोहर हांडाल , डॉ गोरख गुळवे, लतिश पाटील, बाळकृष्ण सोनवणे,संतोष बाबर,रामभाऊ येडे, बाबू वाळेकर , संदीप चाकणे, उदय खाडमोडे-पाटील , सागर गोडसे, श्याम ओंभासे,गणेश घोरपडे ,बिबिशन गायकवाड, रामवाडीचे नूतन सरपंच गौरव झांजुणे , अजित अण्णा रणदिवे, बाळासाहेब कावळे संतोष वारगड,सुरेश झांजुर्ण, तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त मोठ्या संखेंने उपस्तिथ होते.

litsbros

Comment here