करमाळाशैक्षणिकसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या ‘या’ आमदाराकडून करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना स्पर्धापरीक्षा पुस्तकांसह लाखोंची ग्रंथ भेट !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विधान परिषदेच्या ‘या’ आमदाराकडून करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना स्पर्धापरीक्षा पुस्तकांसह लाखोंची ग्रंथ भेट !

करमाळा(प्रतिनिधी); विधान परिषद सदस्य स्थानिक विकास निधी सन 2022- 23 अंतर्गत आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या आमदार फंडातून करमाळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील एकूण 34 सार्वजनिक शासनमान्य ग्रंथालयांना प्रत्येकी 90 हजार रुपये किमतीची एकूण 231 पुस्तके ग्रंथालयास भेट स्वरूपात देण्यात आली.

आमदार वजाहत मिर्झा यांचे वाचन चळवळीतील योगदान व त्याना वाचनाची असलेली आवड यावरून त्यांनी करमाळा तालुक्यातील शासनमान्य वाचनालयांना ग्रंथ भेट देऊन विद्यार्थी व वाचकांची वाचनाची भूक भागवलेले आहे.

यामध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षा पुस्तके, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने ,आत्मचरित्र,कृषी विषयक, इत्यादी प्रकारची पुस्तके असून ती सर्व पुस्तके निवडक स्वरूपात आहेत सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय रावजी पवार यांच्या अथक प्रयत्नातून गेले तीन वर्ष सातत्याने करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना विविध आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात येत आहेत.

आदरणीय मिर्झा साहेब यांच्या विकास निधीतून सलग दोन वर्ष करमाळा तालुक्याला हा निधी अध्यक्ष विजयराव पवार यांच्या माध्यमातून मिळालेला आहे, काल झालेल्या छोट्या खाणी कार्यक्रमात ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा येथे या ग्रंथांचे वाटप ग्रंथालयाचे जेष्ठ पदाधिकारी काटोळे आबा, मोरे अण्णा व ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद बेरे यांच्या उपस्थितीत व शिवसृष्टी प्रकाशनचे प्रमोद पवार, मगर यांच्या हस्ते हे ग्रंथ भेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन भास्कर पवार यांनी प्रास्ताविक गणेश पवार महाराज तर आभार शहाजी सरडे सर यांनी मांडले या कार्यक्रम प्रसंगी करंजे, वीट, बोरगाव, पोमलवाडी, भालेवाडी, केम, रावगाव, निंभोरे,फिरे,सरपंच, पांडे ,सांगवी, आळजापूर, ढेकळवाडी, शेलगाव, पांगरे, घोटी, झरे, जातेगाव, कात्रज, वडशिवणे, उंदरगाव, अंजनगाव,केम,सातोली, पोपळज, करमाळा, कोर्टी, अर्जुन नगर ,पांडे आदि वाचनालयातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आमदार वजाहत मिर्झा, व ग्रथालय संघाचे अध्यक्ष विजयराव पवार याचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

litsbros

Comment here