करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात ‘या’ गावात शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात ‘या’ गावात शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!

करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यातील अहमदनगर टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या मांगी वडगाव पुनवर या परिसरात गेली कित्येक महिन्यापासून बिबट्याने हैदोस घातला आहे या बिबट्याने आज सकाळी दहा वाजता उत्तर वडगाव येथील शेतकरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे त्यातून ते सही सलामत सुटले आहे
याबाबतची माहिती अशी की उत्तर वडगाव येथील शेतकरी राजेंद्र नरसाळे हे नेहमीच्या पद्धतीने आपल्या उसाच्या शेताकडे गेले होते.

ते शेतात आपले काम उरकून त्यातून बाहेर आले असता अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात बिबट्याने त्यांचे पाय धरले असता त्यांनी त्यांच्याकडील असणाऱ्या कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला या कोयत्याच्या हल्ल्यामुळे बिबट्या त्या शेतकऱ्याला सोडून पळाला दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यातून बाल बाल बचावले.

सदरचा प्रकार हा आज सकाळी दहा वाजता त्यांच्या उसाच्या शेताच्या बाहेर घडला आहे त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या कळताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना करमाळा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे त्यांची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरने सांगितले आहे

सदरचा बिबट्या हा गेली दोन ते तीन महिन्यापासून पुनवर, वडगाव उत्तर व दक्षिण, मांगी परिसरात राजरोसपणे फिरत आहे यासाठी वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले आहे मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही बिबट्याने मात्र आता आपला मोर्चा मानवी वर्गाकडे वळविला आहे.

हेही वाचा – डॉ.सानिया शेख या करमाळा नगर परिषद शाळेच्या विद्यार्थीनी ही अभिमानाची बाब – चंद्रकला तांगडे

करमाळा तालुक्यातील ‘या’ तरुणांनी घेतली अंतरवली सराटा येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट

सदर बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी मांगी व वडगाव परिसरातील शेतकरी मधून होत आहे सदर परिसराची पाहणी करण्याकरिता मोहोळ सोलापूर येथील वरिष्ठ वनपाल अधिकारी वडगाव येथे दाखल झाले आहेत.

litsbros

Comment here