करमाळा

करमाळा तालुक्यातील ‘या’ तरुणांनी घेतली अंतरवली सराटा येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ तरुणांनी घेतली अंतरवली सराटा येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट

वाशिंबे (सचिन भोईटे ):-मराठा समाजाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असून,सरकारने यावर योग्य तोडगा काढून लवकरात लवकर आरक्षण देऊन मराठा समाजाला पाठबळ द्यावे.उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनात वाशिंबे येथील मराठा समाजातील तरुणांनी धरणे आंदोलन कार्यस्थळी अंतरवली सराटा जि.जालना येथे जाऊन भेट घेतली.आपली समाजाबद्दलची अस्था पाहुण आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असा विश्वास तरुणांनी दिला.

भाऊसाहेब झोळ म्हणाले,मराठा समाज अनेक पक्ष व संघटनांमध्ये विखुरलेला असल्याने समाजाचा राजकारण्यांवर वचक राहिला नव्हता. त्यामुळे जालन्यासारख्या घटना घडल्या. पण,मात्र माता-भगिनींचे रक्त पाहून समाज चवताळून गेला आहे. सरकारने आमच्या हक्काचं आरक्षण न दिल्यास संबंधित राजकारणांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जरांगे-पाटील यांना पाठिंबाचे निवेदन दिले आहे.यावेळी भाऊसाहेब झोळ उपाध्यक्ष शेतकरी संघटना सोलापूर,आण्णा झोळ,सुनिल झोळ,हर्षवर्धन पाटील,अमित देशमुख,अरविंद पवार,धनाजी झोळ,अब्बास शेख,विशाल‌ वाघमोडे आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here