करमाळासोलापूर जिल्हा

करमाळयात कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्तीची मागणी; अनेक प्रशासकीय कामे खोळंबली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयात कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्तीची मागणी; अनेक प्रशासकीय कामे खोळंबली

करमाळा (प्रतिनिधी); गेली सहा ते सात महिन्यापासून महसूल प्रशासनातील महत्त्वाचा घटक म्हणजे तहसीलदार सात महिन्यापासून रिक्त असून सदर रिक्त पदाची जागा त्वरित भरण्यात यावी अशी मागणी करमाळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

महसूल प्रशासनातील महत्त्वाचा घटक म्हणजे तहसीलदार मात्र सध्या तहसीलदार नसेल तर कामे कशी करावयाची गेली सात महिन्यापासून नायब तहसीलदार हेच तहसीलदाराची पदे सांभाळत असून सध्या सदरची जागा रिक्त असल्याने अनेक शासकीय कामे खोळंबली आहेत विशेषता सर्वसामान्य नागरिक शेतकरी वर्ग वकील वर्ग यांना याचा नाहक भुर्दंड बसत असून शासनाने सदरची रिक्त जागा त्वरित भरावी व सर्वसामान्य चा होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.

शासकीय काम आणि सहा महिने थांब या पद्धतीने सध्याची महसूल यंत्रणा तहसीलदार अभावी खोळंबलेली दिसत आहे कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सध्या तहसील कार्यालयात भोंगळ कारभार चालू असून फक्त राजकीय अस्तित्वाच्या लढाईमध्ये तहसीलदार हे पद सध्या रिक्त असल्याचे बोलले जात आहे.

तहसीलदार अभावी अनेक शासकीय कामे सध्या होतं नसून यामुळे न्यायालयीन क्षेत्रातील पक्षकार व वकील यांचे देखील कामकाज कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने होत नसल्याचे एका ज्येष्ठ वकील यांनी बोलताना सांगितले यामुळे रस्त्याची प्रकरणे, कुळ कायद्याची प्रकरणे, तसेच दरखास्त यासंबंधीत सर्व प्रकरणे प्रलंबित होत आहे.

यामुळे पक्षकाराचे मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे याशिवाय शासकीय कार्यालयातील अनेक प्रलंबित प्रश्न अद्यापही केवळ तहसीलदार पदाच्या रिक्तपणामुळे खोळंबली आहेत

तेव्हा गेली सात ते आठ महिन्यापासून केवळ राजकीय अस्तित्वाच्या प्रतिष्ठेपोटी रिक्त असणाऱ्या तहसीलदार पदाची नियुक्ती त्वरित करावे अशी मागणी होत आहे.

सदर नियुक्तीची मागणी यापूर्वी विविध पक्षांच्या संघटनेने केली होती मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही नवीन तहसीलदाराची नियुक्ती झाली नसल्याने सर्वसामान्य वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा – अखेर जगताप पितापुत्र भाजपच्या अधिकृत यादीत!विशेष निमंत्रिताच्या यादीत मा.आ.जयवंतराव जगताप तर शंभुराजे जगताप यांची..

ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

तहसील कार्यालयात खाजगी एजंटाचा होत आहे सुळसुळाट

करमाळा तहसील कार्यालय मध्ये कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने खाजगी एजंटाचा मात्र धंदा मोठ्या प्रमाणात चालू असून अनेक खाजगी एजंट तहसील कार्यालयाच्या आवारात मोकाटपणे फिरत असून सर्व कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांशी हात मिळवणे करीत सदरचे एजंट सध्या मालामाल झालेले आहेत सदरचे एजंट केवळ तहसीलदार नसल्याने मीच तहसीलदार आहे अशा अविर्भावात कामे करीत असून अनेक सर्वसामान्य शेतकरी व सामान्य नागरिक यांना राजरोसपणे लुटत आहे.

सध्या खाजगी एजंट पुरवठा ऑफिस, तहसील कार्यालय, सेतू विभाग, सिटी सर्वे ऑफिस, पंचायत समिती आधी महसूल प्रशासनातील कार्यालया मध्ये राजरोसपणे या खाजगी एजंटाचा वावर वाढला असून अनेक गरजू शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना ते एजंट मी कामे करतो अशी बतावणी करीत लुटत आहेत सध्या तहसील कार्यालयातील कारभार मात्र खाजगी एजंट मार्फत चालविला जातो तेव्हा अशा खाजगी एजंटाचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग यामधून होत आहे.

litsbros

Comment here