करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा भाजपाच्या वतीने देवळाली येथे मन की बात कार्यक्रम व टिफिन बैठक संपन्न 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा भाजपाच्या वतीने देवळाली येथे मन की बात कार्यक्रम व टिफिन बैठक संपन्न 

करमाळा- करमाळा भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 104 वा मन की बात कार्यक्रम व टिफिन बैठक कार्यक्रम मौजे देवळाली येथे संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे उपस्थित होते, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले.

मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयान-3 च्या मोहिमेच्या यशाचे कौतुक करत नव्या भारतासाठी ही प्रेरणादायी मोहीम असल्याचे म्हटले आहे. तसेच या क्षणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची कविता देखील ऐकवली,


यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, “चांद्रयानाचे यश हे खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी चांद्रयानाची चर्चा होत आहे. यशाचा सूर्य हा चंद्रावर देखील उगवतो असं चांद्रयानाच्या यशानंतर म्हटलं जात आहे. चांद्रयान भारताचे असे स्पिरीट बनले आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त जिंकण्याचे ध्येय साध्य करु शकते.”
‘चांद्रयान नारी शक्तीचं उदाहरण’
पंतप्रधान मोदी यांनी चंद्रयानाच्या मोहिमेतील नारीशक्तीच्या योगदानाबद्दल देखील भाष्य केलं. “भारतातील महिला या आता अंतराळाला देखील आव्हान देत आहेत. भारताच्या मुलींची महत्त्वकांक्षा इतकी वाढली आहे की, देशाचा विकास करण्यापासून त्यांना आता कोणीही थांबवू शकत नाही.”
असे त्यांनी सांगितले,
मन की बात कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील पदाधिकाऱ्यांची टिफिन बैठक संपन्न झाली, यावेळी जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन झिंजाडे व आभार प्रदर्शन मन की बात चे तालुका संयोजक दत्तात्रय पोटे यांनी केले.


यावेळी बाळासाहेब कुंभार , महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव , देवळाली चे माजी सरपंच संतोष गायकवाड, उपसरपंच संदिपान कानगुडे, शहाजी बापू कानगुडे, ग्रा. सदस्य फटु कानगुडे,लक्ष्मण केकान,सोमनाथ घाडगे, नितीन झिंजाडे, सचिन गायकवाड, विष्णू रणदिवे, अमोल पवार ,आजिनाथ सुरवसे, भैयाराज गोसावी, बापू मोहोळकर ,सौदागर बिचीतकर ,संजय कानगुडे ,धर्मराज नाळे , प्रदीप ढेरे महाराज, धनजय चोपडे, शरद कानगुदे, सचिन ढेरे, रवी पाटील ,सतिश वीर , महेश झोळे, चेतन राखुंडे,

हेही वाचा – बागल यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत दहशत, तात्काळ बंदोबस्त न केल्यास वन अधिकाऱ्यांना काळे फासू.. रासपचा इशारा!

अरे बापरे ! चमत्कार.!करमाळा एमआयडीसीतील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर उगवली झाडे

नामदेव गुंड, किसन मोरे ,निलेश चौधरी ,हर्षद गाडे, रवी माळवे, विनोद महानवर ,नितीन कानगुडे , दादा पाठक, राजेश पाटील, भरत गुंड, बजरंग मोहोळकर ,संदीप काळे ,शांतीलाल वलटे, पंकज बिचितकर, नाना गलांडे,नागनाथ केकान, ,तुकाराम भोसले, अशोक सातपुते, विशाल घाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

litsbros

Comment here