करमाळा

श्री.राजेश्वर विद्यालय राजुरी थ्रो बॉल संघ जिल्हास्तरीय विजेता 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री.राजेश्वर विद्यालय राजुरी थ्रो बॉल संघ जिल्हास्तरीय विजेता 

केत्तूर (अभय माने) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजीत शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धा सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी सहभाग नोंदवला होता. 

करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात राजुरीच्या 14 वर्ष वयोगटातील संघाने अक्कलकोट संघास पराभव करत अंतिम सामना जिंकला व विजेते पदावर आपले नाव नोंदवले तसेच श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी प्रशालेच्या 17 वर्ष वयोगटातील संघ अंतिम सामन्यात अक्कलकोट संघाकडून पराभव पत्करावा लागला.

 सदर स्पर्धेत श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी शाळेच्या 17 वर्ष वयोगटातील खेळाडूचां संघ उपविजयी झाला. थ्रो बॉल संघातील खेळाडूंना श्री.मारुती संदिपान साखरे, राष्ट्रीय खेळाडू विठ्ठल सरोदे (सोलापूर) व संतोष पाटील (अक्कलकोट) यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी खेळाडूंचे वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव श्री. लालासाहेब गोविंद जगताप सर, प्रशालेचे मुख्याध्यापक . अनिल सोपान झोळ, जिल्हा क्रीडा अधिकरी मा. गणेश पवार,जिल्हा थ्रो बॉल अशोसियनचे सचिव मा. संतोष खेंडे व प्रशालेच्या शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व राजुरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!