करमाळासोलापूर जिल्हा

गुळसडी येथे ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन; नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गुळसडी येथे ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन; नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबणार

करमाळा(प्रतिनिधी);
गुळसडी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते नवीन ट्रांसफार्मरचे उद्घाटन करण्यात आले.

गुळसडी गावात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यात आले आहे ,परंतु या जल जीवन मिशन योजनेच्या सिंचन विहिरी वरती लाईटची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऐन दुष्काळामध्ये ही योजना बंद होती. त्यामुळे गावातील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत होते.

यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्याकडे ट्रांसफार्मरची मागणी केली यावर गणेशभाऊ चिवटे यांनी लगेच प्रशासकीय लेव्हलवर मदत करून अवघ्या चार दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून चालू करून दिला त्यामुळे ही योजना लवकर चालू होऊन याचा गुरसळी ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे.

त्यामुळे सर्व गुरसळी ग्रामस्थांच्या वतीने गणेश भाऊंचे आभार व्यक्त करतो असे मत गुरसळीचे सरपंच प्रमोद भंडारे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,गुरसळीचे सरपंच श्री प्रमोद भंडारे, उपसरपंच श्री योगेश भंडारे, माजी सरपंच श्री समाधान यादव, ग्रा. सदस्य श्री महावीर कळसे,ग्रा.सदस्य श्री नारायण भाऊ भोसले, माजी सरपंच व पोलीस पाटील

हेही वाचा – के.के.लाईफस्टाईल करमाळा येथे दिवाळी ऑफर “हमखास बक्षीस योजना” सुरू ; ‘या’ लकी ग्राहकाला मिळाला सॅमसंग मोबाईल गिफ्ट

** प्राजक्तांच्या फुलातलं म्हातारपण ** // इथं रिटायर लोकांचं मांडलंय… // // हाय ती बरंय म्हणायचं //

श्री धनंजय अडसूळ, तंटामुक्ती चे अध्यक्ष श्री मकरंद बापु खंडागळे, माजी ग्रा. सदस्य श्री तानाजी खंडागळे, श्री संतोष शिंदे, शरद यादव, राहुल यादव, पांडुरंग कळसे, बापु मोहोळकर, सतिष बागल, आण्णा भंडारे, शामराव पडवळे,राज भंडारे, अविनाश सुर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here