ऐन दिवाळीत केरसुणींचे दर घसरल्याने विक्रेते नाराज
केत्तूर (अभय माने) दिवाळी मधील लक्ष्मीपूजना दिवशी नवीन केरसुणी (लक्ष्मी) विकत घेऊन तिची पूजा करण्याचा करण्याची हिंदू संस्कृतीनुसार प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे केरसुनीला विशेष महत्त्व असते. ग्रामीण भागातील आठवडा बाजारामध्ये आवक व विक्रेते जास्त आल्यामुळे वाढल्यामुळे केटसुनीचे दर मात्र कमी झाल्याचे दिसून आले त्यामुळे विक्रेत्यामधून नाराजीचा सूर होता.
महागाईमुळे केरसुची दर यंदा 15 ते 20 टक्के वाढले होते परंतु बाजारात मोठी आवक झाल्याने मोठी किसणी 60 रुपये तर लहान करसुनी 50 रुपये दराने विकली जात होती.येरव्ही हीच मोठी केरसुनी ८० रुपये व लहान केरसूनी 70 रुपयाला विकत घ्यावी लागत आहे.
केरसुनीला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी महत्त्वाचे स्थान असते तिची हळदीकुंकू वाहून विधिवत पूजा केली जाते.
मात्र ग्रामीण भागातील शिंदीच्या झाडाचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याने परराज्यातून केरसुनी विक्रीसाठी येत आहे.
हेही वाचा – नेरले परिसरात महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी आता तरी जोडा.!
आधुनिक काळात व्हक्युम क्लिनर व इतर साफसफाईची साधने उपलब्ध असली तरी लक्ष्मीपूजना दिवशी केरसुनीलाच महत्त्वाचे स्थान असते.
पूर्वी घरे शेणा-मातीची होती ती साफ करण्यासाठी झाडू म्हणून शिंदोळ्याच्या पानाच्या झावळ्या वापरल्या जात असे. आता नायलॉनच्या दोरीच्या साह्याने केरसुनी बांधावी लागत आहे.
छायाचित्र- केत्तूर :आठवडा बाजारात आवक जास्त झाल्यामुळे केरसुणीचे दर घसरले होते. (छायाचित्र : अक्षय माने, केत्तूर)
Comment here