नेरले परिसरात महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी आता तरी जोडा.!
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी जोडण्याची मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे यांनी केली आहे. नेरले तालुका करमाळा येथे परांडा कडून घोटी सब स्टेशनला येणारी मेन लाईन नेरले मुंगशी रोड लगत आहे.
त्या लाईनच्या चार-पाच ठिकाणी तारा सहा महिन्यापूर्वी तुटून मुंगशी रोडला पडल्या आहेत. तारा मुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत.नेरले गौंडरे रोड लगत असणारा राजेभोसले डीपी हा तांत्रिक बिघाडामुळे दोन महिन्यापासून बंद आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांच्या चाऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.डीपी बंद असल्यामुळे पाण्याअभावी जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वरील दोन्हीही कामासाठी आम्ही वायर मॅन धनंजय कानडे ज्युनिअर अभियंता जाधव साडे तसेच अभियंता जेऊर यांना मोबाईल द्वारे व समक्ष भेटून अनेक वेळा सांगत आहोत.
तरी देखील रस्त्यावर पडलेल्या तारा जोडल्या नाहीत व डीपी देखील सुरू केला नाही. नागरिक तक्रारी सांगण्यात गेले असता श्री भोयर हे लोकांना जेऊर कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगतात आमच्याकडे साहित्य शिल्लक नाही.
साहित्य आल्यानंतर बघू आम्हाला वेळ असेल तेव्हा काम करू जेऊर कार्यालय स्वतःच्या मालकीचे असल्यासारखी उत्तरे देत आहेत.
तारा तुटल्यामुळे व डीपी बंद असल्यामुळे शेळ्या मेंढ्या जनावरे व नागरिकांच्या जीवितास आज धोका होऊ शकतो याची सर्वस्वी जबाबदारी सहाय्यक अभियंता भोयर यांची असेल वरील दोन्ही कामे आठ दिवसाच्या आत पूर्ण करावीत अन्यथा आम्ही जेऊर येथील भोयर यांच्या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे माजी सरपंच श्री.औदुंबराजे भोसले यानी चंद्रकांत पाटील पालकमंत्री सोलापूर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा,
आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार संजयमामा शिंदे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी डिव्हिजन बार्शी मा तहसीलदार साहेब करमाळा मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे करमाळा यांना दिले आहे.
Comment here