दारफळचे केदार बारबोले यांचा ग्रामस्थ व मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार
माढा / प्रतिनिधी – राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 6 वा क्रमांक पटकाविल्याबद्दल केदार प्रकाश बारबोले यांचा दारफळ सीना येथील ग्रामस्थ,विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था,विकास सोसायटी, ग्रामपंचायत,शिक्षक संघटना, नातेवाईक व रणजितसिंह शिंदे मित्रमंडळ यांच्यासह मराठा सेवा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी केदार बारबोले यांनी सांगितले की,मराठा व कुणबी समाजांतील उमेदवारांना महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी मार्फत विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून त्याचा लाभ घेतला पाहिजे.ही संस्था सामुदायिक प्रवेश परीक्षेतून उमेदवारांची निवड करते.या उमेदवारांना दरमहा विद्यावेतन दिले जाते. पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा मुलाखतीसाठी एकरकमी विद्यावेतन दिले जाते. मी सारथीच्या या सर्व योजनांचा लाभार्थी असल्याचे बारबोले यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी नागरे बँक असोसिएशनचे चेअरमन अशोक लुणावत, तहसीलदार प्रदीप उबाळे,झुंजार भांगे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,दत्ताजी शिंदे,प्राचार्य विजयकुमार उबाळे,सरपंच अशोक शिंदे,उपसरपंच कुमार शिंदे,शिवाजी बारबोले,अरुण कांबळे,औदुंबर उबाळे,आबासाहेब उबाळे,प्रदीप कांबळे,मित्रमंडळाचे अध्यक्ष नानासाहेब बागल,विजय शिंदे,वामन हांडे,विनोद परिचारक,संदीप भोसले, किशोर शिंदे,सुहास चवरे,अरुण जगताप,शिवाजी गवळी,सचिन महिंगडे,विजय उबाळे,औदुंबर चव्हाण,विशाल बारबोले,श्रीकांत आतकरे,सोमनाथ उबाळे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी -दारफळ सीना ता.माढा येथे केदार बारबोले यांचा सत्कार करताना रणजितसिंह शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष नानासाहेब बागल,विजय उबाळे,औदुंबर चव्हाण व इतर मान्यवर.
Comment here