क्राइम

धक्कादायक! घराला चारी बाजूनी करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! घराला चारी बाजूनी करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये घराला चारी बाजूनी 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न झाल्याची थरारक घडली. वांगीमधील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घरासमोर व मागील दरवाज्यास विद्युत वाहक तारे 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलाचे हे घर आहे. 11 केव्ही विजेवर करंट दिल्याने विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्याने सुदैवाने निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले. सदर घटनेची माहिती चिंचणी – वांगी पोलिसांना देण्यात आली आहे. 

अशोक निकम हे वांगी गावात कुटुंबासह राहतात. रात्रीच्या वेळी निकम आपली पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपी गेले. रात्री एक वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र, घराजवळ ट्रान्सफार्मर असल्यामुळे त्यांनी ट्रान्सफार्ममध्ये जाळ झाला असेल समजून दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. 

बॅटरीच्या सहाय्याने बाहेर पाहिल्यास त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसून आली. 11 केव्ही या तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले. अज्ञात लोकांनी कंरट दिलेली वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्या वायरला एक हजार फूट लाब हिरव्या रंगाची नायलॉन रशी बांधून ती उसातून जोडून ठेवली होती. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते त्यात अयशस्वी झाले अन् घटनास्थळापासून पलायन केले. या प्रकरणातून निकम कुटुंब सहीसलामत बचावले आहे.

litsbros

Comment here