करमाळाक्राइम

निंभोरे येथे भरदिवसा चोरट्यांनी दोन लाखांचा माल केला लंपास !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निंभोरे येथे भरदिवसा चोरट्यांनी दोन लाखांचा माल केला लंपास !

केम(प्रतिनिधी- संजय जाधव);

करमाळा तालुक्यातील निंभोरे वडशिवणे रस्ता शेजारील लक्ष्मण मारकड यांच्या घरी शुक्रवारी दि २९सप्टेबर रोजी दूपारी ३ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उघडून कपाटातील सुमारे २ लाख रूपये किमतीचे दागिने लंपास केले.

याबाबतची फिर्याद अमित लक्ष्मण मारकड याने करमाळा पोलीसात दिली आहे. त्यामध्ये म्हटले कि २९ तारखेला वडिलांना सोडविण्यासाठी जेऊर रेल्वे स्टेशन वर २ च्या सुमारास गेलो होतो. घरी माझी आई घराच्या बाजूला जनावरांसाठी गिनी गोल काढत होती. तिला ३ च्या सुमारास घरातून जाताना दोन व्यक्ती दिसल्या त्यांनंतर घर ऊघडे दिसले. घरात प्रवेश केल्यावर कपाट ऊघडून साहित्य बाहेर  अस्ताव्यस्त टाकलेले दिसले.

या कपाटामध्ये ठेवलेले साडे तीन तोळयाचे सोन्याचे गंठण व दिड त़ोळयाचे मिनी गंठण असे मिळून दोन लाखाचे दागिने लंपास केले. 

 याबाबत करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. करमाळा पोलीसात अज्ञात चोरटया विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

litsbros

Comment here