करमाळा क्राइम

करमाळ्यातील टाकळी येथे पुन्हा चार टन मांगुर मासा नष्ट: उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यातील टाकळी येथे पुन्हा चार टन मांगुर मासा नष्ट: उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

करमाळा(प्रतिनिधी – अलीम शेख); तालुक्यात प्रतिबंधीत मांगुर मासा पैदास उत्पादन ,संवर्धन ,विक्री मोठ्या प्रमाणात होत असुन याविरोधात मस्यविभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे. सोलापूर चे सहाय्यक आयुक्त पि.जी .विरकर यांनी उजनी जलाशय काठच्या तालुक्यातील टाकळी येथे तीन टन मांगूर मासा नष्ट केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मस्यविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित सोपान झोळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पुन्हा ऋषिकेश करचे व गोरख नरहरी मोरे यांच्या मांगुर मत्स्यतलावातील तब्बल चार टन मांगूर मासा नष्ट करण्यात आला आहे.

उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित झोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. यामध्ये उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता एस आर मगदूम, कनिष्ठ अभियंता के एन सौंदणे, मत्स्य विभागाचे राजेश पाटील, कालवा निरीक्षक नासीर खान, जलसंपदा विभागाचे श्री शिंदे, डी बी सरडे ,आर बी येडे, पोलीस हवालदार गणेश काळे, प्रशांत गायकवाड,

पोलीस पाटील सोमनाथ कुचेकर आदी शासकीय कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थितीत होते. जलसंपदा विभाग अंतर्गत उजनी धरण व्यवस्थापन विभाग , भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक एक, मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. पहिल्याच दिवशी सहाय्यक आयुक्त पी जी विरकर यांनी शासनाने बंदी घातलेले मांगुर मासे चे संवर्धन करणारे तलावावरील कारवाई करून तब्बल तीन टन मासा नष्ट केला होता.

उजनी जलाशयाकाठी सातत्याने आरोग्याला व पर्यावरणाला घातक असलेला मांगुर मासा संवर्धन करून उत्पादन व विक्रीला शासनाने बंदी घातलेली आहे मात्र पर्यावरणाला धोका करणारा व मानवाला कर्करोगासारख्या भयानक रोगाला बळी पाडणारा मांगुरमासा याची पैदास वाढ लवकर व मोठ्या प्रमाणात होत असल्याने या मांगुर माशाचे उत्पादन व विक्री कडे काही अपप्रवृत्तीने वागणारे लोक या व्यवसायाकडे वळलेले आहेत.


सडके, कुजलेले असे मांस हे या माशाना खाद्य म्हणून वापरले जात असल्याने व हे मांगुर मासे डबक्यात ,घाणीत तसेच गटारीत वाढत असल्याने तसेच ते उजनी धरणातील सर्वच गोड्या व विविध प्रकारचे जलचर प्राण्यांना लक्ष्य करत असल्याने या माशाना तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात उजनीत मस्य विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडून सोडलेले मत्स्यबीज हे फस्त करत आहेत. एकंदर या मांगुर माशामुळे पर्यावरणाला व मानवला गंभीर धोका निर्माण झाल्याने त्याला प्रतिबंधित केलेले आहे.

असे असतानाही मोठ्या संख्येने मांगुर मासांचे उत्पादन घेऊन एजंटमार्फत विक्री चालू आहे. त्यामुळे सदर व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध मत्स्य विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केलेली आहे. संपूर्ण उजनी जलाशयासाठी प्रत्येक गावागावांमध्ये मांगुर माशाचे संवर्धनाचे तलाव दिसून येत आहेत. त्यामुळे याकडे शासनाने गांभीर्याने पाहिले असून कठोर कारवाई करण्यात येत आहे .

सध्या उजनी जलाशयाकाठी मांगुर मास्याचे जलसंवर्धन तलाव व उत्पादन विक्री करण्याचे प्रकार आढळून येत आहेत. अशा मत्स्य तलावाची गोपनीय माहिती मिळाली की मस्य विभागा मार्फत यावर कारवाई करण्यात येत असून पोलिसात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे प्रतिबंधित मांगुर माशाचे उत्पादन कोणीही घेऊ नये. सध्या ही मोहीम अधिक तीव्र करत असून या विरोधात मांगुर मासे नष्ट करण्याबरोबर तलाव ही नष्ट करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे मागुर मास्याचे उत्पादन घेऊ नये.

… अजित झोळ उपविभागीय अधिकारी, उजनी धरण व्यवस्थापन विभाग करमाळा

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!