क्राइममहाराष्ट्र

धक्कादायक! नैराश्यातून वडिलांचीच केली हत्या 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! नैराश्यातून वडिलांचीच केली हत्या 

डॉक्टर मुलाने ७० वर्षीय वृद्ध वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. बीएएमएसची पदवी घेऊन एमडीच्या परीक्षेत अपयश आल्याने नैराश्यातून मुलाने वडिलांचा खून केला. बीडमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरेश काशिनाथ कुलकर्णी वय 70 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुधीर असं मुलाचं नाव आहे.

सुरेश कुलकर्णी यांचा मुलगा सुधीर कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने एमडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. परंतु त्यात अपयश आल्याने सुधीर नैराश्यात गेला होता. तेव्हापासून तो घरीच असायचा. यादरम्यान त्याने वडील सुरेश कुलकर्णी यांच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून खून केलाय. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणार्या कुलकर्णी यांचा मुलगा डॉ सुधिर सुरेश कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने मंगळवारी मध्यरात्री जन्मदात्या बापाचा ( सुरेश काशीनाथ कुलकर्णी वय 70) खुन केला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कलकर्णी वय 62 यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी वय 38 यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

litsbros

Comment here