मुसळधार पावसामुळे गुरुवारी ‘ या’ जिल्हयातील शाळांना सुट्टी
राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आता काही भागांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मंगळवारपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तर नद्या-नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत. त्यातच आता पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हेच लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांना सुट्टी देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आहे.
कोकण विभागात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
कोणत्या भागांत शाळांना सुट्टी?
मुंबई
ठाणे
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
गडचिरोली
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरुवारी (20 जुलै 2023) सुट्टी जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्यातील इतर भागातील पावसाची परिस्थिती पाहून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी म्हटलं आहे.
Comment here