अंजनगाव खेलोबा येथे यात्रेनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेस गुरुवार पासून सुरुवात झाली आहे.या यात्रेनिमित्त युवा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा या कार्यक्रमामध्ये अंजनगाव मधील विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये गावातील सहाय्यक आरटीओ पदी निवड झाल्याबद्दल प्रियंका लक्ष्मण गडेकर ,महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल मुक्ता राजेंद्र वाघमोडे व पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला.
गावच्या सूनबाईची गावात पोस्ट मास्तर म्हणून नेमणूक; निंभोरेकरांनी केला सन्मान
या कार्यक्रमासाठी फरांडे महाराज नाना देव, क्रीडा अधिकारी कैलास लटके, वैभव लटके, अजिंक्य पाटील, लखन डोके, बापू कोरके, गणेश वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य, जीवन जाधव, सचिन गोरे, रवळनाथ चौगुले माऊली चौगुले, वगरे साहेब व गावातील युवा वर्ग व गुणवंतांचे पालक उपस्थित होते.
Comment here