गावच्या सूनबाईची गावात पोस्ट मास्तर म्हणून नेमणूक; निंभोरेकरांनी केला सन्मान
केम(प्रतिनिधी); आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन महिला पोस्ट मास्तर सौ.प्रियंका राजेंद्र पासंगराव यांचा यथोचित सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचा सन्मान सौ. नंदाबाई महादेव मारकड यांचे हस्ते करण्यात आला.
सत्कारास विशेष कारण म्हणजे निंभोरे गावातील रहिवासी व श्री खंडेश्वर देवस्थानचे पुजारी श्री.भालुकाका पासंगराव/गुरव यांच्या त्या सूनबाई आहेत. त्यामुळे सौ.प्रियंका पासंगराव या निंभोरे गावच्या रहिवाशी असणार्या पहिल्या महिला पोस्ट मास्तर ठरल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व आर. व्ही.ग्रुप चे सर्वेसर्वा रविदादा वळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
या ग्रुप तर्फे नेहमीच गावातील सर्वसामान्य लोकांच्या चांगल्या कार्याचे व प्रगतीचे कौतुक केले जाते. आर. व्ही. ग्रुप तर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य सुरू असते. गावातील शाळेसाठी,समाजासाठी, सर्व सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा ग्रुप नेहमी प्रयत्नशील असतो.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर,निंभोरे सोसायटीचे नूतन चेअरमन अशोक बप्पा वळेकर, छगनकाका वाघमारे, राजाभाऊ पासंगराव, भाऊसाहेब वळेकर , प्रवीण वळेकर, दत्ताभाऊ वळेकर, ईश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, लक्ष्मण वळेकर, भरतरी माळी,सदाशिव गाडे,दशरथ जगताप, बापू वळेकर,गणेश वळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment here