आम्ही साहित्यिकपुणे

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा वाढदिवसा निमित्त परिवर्तनवादी कवी संमेलन संपन्न; महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींचा सहभाग, मान्यवरांची उपस्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा वाढदिवसा निमित्त परिवर्तनवादी कवी संमेलन संपन्न; महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींचा सहभाग, मान्यवरांची उपस्थिती

पुणे(प्रतिनिधी); जगदीशब्द फाऊंडेशनचे संस्थापक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी व लेखक जगदीश ओहोळ यांच्या वाढदिवसा निमित्त साहित्य सारथी कला मंच यांच्या वतीने परिवर्तनवादी कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार संघाचे मंत्रालयीन संपर्क प्रमुख नितीन जाधव साहेब उपस्थित होते.

यावेळी जाधव म्हणाले की, सध्या राजकारणाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. लोकशाही ही दिवसेंदिवस ठोकशाही होत चालली आहे. या काळात जगदीश ओहोळ यांच्यासारखे व्याख्याते, कवी, लेखक व्यवस्थेवर भाष्य करत आहेत. जगदीशब्द फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ बालकांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन अनेक सामाजिक जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत. तसेच शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक व्याख्याने करत आहेत. आता इतर ही सर्वच कवी, लेखकांनी वास्तववादी साहित्य निर्माण करुन सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारे लिखाण करणे गरजेचे आहे. काळ मोठा वाईट आला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, माणूस किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगाला हे अधिक महत्त्वाचे आहे. एका मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर जगदीश ओहोळ यांनी त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू केले आहे. त्यांच्या कामाचा वेग अधिक झाला आहे. नक्कीच ते लवकरच महाराष्ट्र पादाक्रांत करतील. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक आयडॉल मिळाला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
दैनिक टोला चे मुख्य संपादक मा. डॉ. बळीराम ओहोळ, जूनी पेन्शन हक्क संघटना चे राज्यअध्यक्ष मा. सागर शिंदे, सा. आमोदचे संपादक एम के जावळे, सुप्रसिद्ध गझलकार नवनाथ खरात, उद्योजक निलेश पाखरे, सिरम कंपनीचे पांडुरंग राऊत, डॉ.सचिन भिमकर, सामाजिक कार्यकर्ते, थेऊर पतसंस्थेचे संचालक दिलीप दादा लगड, लेखक बालाजी गायकवाड, प्रवीण भवाळ सर, किशोर चव्हाण, संदीप गायकवाड, पत्रकार प्रा.चैतन्य ओहोळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

या कविसंमेलनात चाळीसहून अधिक कवींनी विविध सामाजिक विषयावर परिवर्तनवादी कविता सादर करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले. शहाजी वाघमारे, रुपाली भोरकडे, प्रा.मोहन रसाळ, कविता हाडवळे, गुलाबराजा फुलमाळी,रमेश जाधव, दिपीका कटरे, संगीता गव्हाणे, जोती ओहोळ, राजश्री वाणी, राहुल भोसले, चंद्रकांत जोगदंड, देवेंद्र गावंडे, लक्ष्मण शिंदे, सुवर्णा वाघमारे, उमाताई लाकडी, पल्लवी नाईक, धर्माधिकारी ताई व तानाजी शिंदे यांनी बहारदार रचना सादर करुन कविसंमेलनात शोभा वाढवली.

गझलकार नवनाथ खरात सर, डॉ. प्रशांत पाटोळे, गझलकार अरुण कटारे, उर्दू गझलकार उद्धव महाजन सर यांनी बहारदार गझलेचा नजराणा पेश करीत रसिकांची वाहवा मिळवली.

हेही वाचा – वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून मारहाण प्रकरण; कुंभारगाव येथील त्या आरोपींचा जामीन नामंजूर

केम-रोपळे रस्त्यांची दुरावस्था; १५ ऑगस्टपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास स्वातंत्र्य दिनी शिवसेना महिला आघाडी करणार आंदोलन

व्याख्याते जगदीश ओहोळ सर यांच्या वाढदिवसा निमित्त हे परिवर्तनवादी कवी संमेलनाचे आयोजन म्हणजे तरुण पिढीला एक नवा आदर्श व पायंडा घालून दिल्याचे प्रांजळ मत साहित्य सारथी कला मंच चे संस्थापक कवी सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विजय अंधारे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत पाटोळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी शिंदे व केपीं पॅरामेडिकल स्टाफ यांनी परीश्रम घेतले.

litsbros

Comment here