माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

विठ्ठलवाडीचे सुपुत्र आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांचा सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विठ्ठलवाडीचे सुपुत्र आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांचा सन्मान

माढा /प्रतिनिधी – माढा तालुक्यातील शासकीय नोकरदारांचे व अधिकाऱ्यांचे गाव असलेल्या विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड सर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य केले आहे.त्यांनी लेखनीच्या माध्यमातून अनेक सामाजिक व कृषी क्षेत्रातील प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.

त्यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची दखल संबंधित विभागाने घेऊन अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. याबद्दल शिवाजी विद्यापीठात एकत्र शिकलेल्या मित्रमंडळींच्या स्नेहमेळाव्यात डॉ.नेताजी करळे व प्राचार्य डॉ.संतोष कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक अनगर येथील सिनिअर महाविद्यालयातील प्रा.महादेव चव्हाण यांनी केले.

पत्रकार राजेंद्र गुंड सर यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील वस्तुनिष्ठ व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2019 मध्ये राहूल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आमदार बबनदादा शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने व सन 2022 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तुळजापूर येथील बालाघाट मराठी साहित्य संमेलनात दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.पत्रकार राजेंद्र गुंड यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न व व्यथा मांडल्या आहेत.लेखनीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील विषयांवर वस्तुनिष्ठ व निर्भिडपणे लेखन केले आहे.

सत्काराला उत्तर देताना पत्रकार राजेंद्र गुंड म्हणाले की, आयुष्यात चांगल्या विचारांचे, गुणी व अभ्यासू आणि यशस्वी मित्र मिळणे हा एक नशिबाचाच भाग आहे.ज्यांना शेवटपर्यंत साथ देणारे नि:स्वार्थी मित्र मिळतात ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात.आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुख्य क्षेत्रातील कार्यासोबत पूरक म्हणून एखादा चांगला छंद जोपासला पाहिजे.माझ्या मित्रांनी केलेला हा सन्मान माझ्यासाठी खरोखरच आनंद व प्रेरणा देणारा आहे.

हेही वाचा – हाजी हाशमुद्दीन तांबोळी चारिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम, गोरगरीब गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप

ओ नेते, ग्रामपंचायत लढवली, आता महिन्यात खर्च सादर करा; शासनाचे आदेश, वाचा कुणाला किती होती मर्यादा?

 प्राचार्य हरिश्चंद्र इंगळे, प्रा.प्रशांत चवरे,सुटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.नेताजी कोकाटे,प्रा.लक्ष्मण उमाटे, डॉ.नित्यानंद थिटे,प्रा.डॉ.भास्कर भवर,प्रा.संजय कारंडे,प्रा.राजेंद्र तांबिले,प्रा.प्रदिप जगताप,प्रा. डॉ.सुशांत काकडे,दिपक टिंगरे, रामचंद्र भांगे,बालाजी बरकडे, अथर्व उमाटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

फोटो ओळी – विठ्ठलवाडी ता. माढा येथील आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांचा सन्मान करताना डॉ.नेताजी करळे, प्राचार्य डॉ.संतोष कदम,प्रा. लक्ष्मण उमाटे, प्रा.महादेव चव्हाण.

litsbros

Comment here