ताज्या घडामोडी

ऑनलाइन खरेदीचा स्थानिक दुकानदार व बाजारपेठाना फटका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ऑनलाइन खरेदीचा स्थानिक दुकानदार व बाजारपेठाना फटका

केत्तूर (अभय माने) : उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय तसेच युवक वर्गानेही ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिल्याने तसेच ऑनलाईन सेवा ग्रामीण भागातही हात पाय पसरत असल्याने स्थानिक व्यापारी वर्गावर मात्र संक्रात आल्याचे दिवाळी सणात दिसून आले.

सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाची आर्थिक उलाढाल मात्र यामुळे जेमतेमच असल्यानेच मोबाईल, इलेक्ट्रिक तसेच कापड व्यवसायालाही ऑनलाइन खरेदीची झळ बसते असे ‘करमाळा माढा न्यूज’ शी बोलताना सांगितले.

      मध्यंतरी कोरोना महामारीच्या  काळात लॉकडाऊन मुळे ऑनलाइन खरेदी कडे ग्राहकांचा कल वाढला होता. सध्याच्या सणासुदीच्या काळातही गत कायम राहिल्याने ऑनलाइन खरेदी करणाऱ्या कंपन्याकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे ग्राहक वर्ग ऑनलाईन खरेदी कडे आकर्षित होत आहे.

 विशेष म्हणजे वस्तू घरपोच मिळत आहेत, त्यातच कर्जानेही वस्तू मिळत असल्याने स्थानिक व्यापारांचा मात्र व्यवसाय धोक्यात आला आहे. महिला वर्गही ऑनलाइन खरेदीकडे आकर्षित होत आहे.

    युवक वर्ग ऑनलाईन खरेदीकडे जास्त आकर्षित झाला असून स्मार्टफोनद्वारे घरपोच सेवा मिळत असल्याने तो खरेदी करीत आहे. घरपोच सेवा मिळत असल्याने युवक वर्ग खुषित आहे त्यामुळे ग्राहकांना स्थानिक बाजारपेठा मधून खरेदी जवळजवळ बंद केली आहे त्यामुळे व्यापारी वर्गाची दुकान भाडे, नोकररांचा पगार व इतर खर्च निघणेही अवघड झाले आहे.

litsbros

Comment here