करमाळासोलापूर जिल्हा

वली बाबा दर्गाह आवाटी येथे ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन; भक्तगणांनी लाभ घेण्याचे ट्रस्टने केले आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वली बाबा दर्गाह आवाटी येथे ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन; भक्तगणांनी लाभ घेण्याचे ट्रस्टने केले आवाहन

करमाळा (प्रतिनिधी); बखशी ए हिंद हजरत शेख शरफुद्दिन बु अली शाह कलंदर नोमानी पानिपती रहमतुल्लाह पानिपत यांच्या स्मरणार्थ आवाटी तालुका करमाळा येथे वली बाबा दर्गाह येथे 724 वा उरूस कलंदर चा धार्मिक कार्यक्रम 1 मे 2023 सोमवार उर्दू तारीख 10 शव्वाल 14 44 हिजरी सोमवार रोजी मोठ्या उत्साहात भरणार असल्याची माहिती आवाटी येथील हजरत सय्यद वली चांद पाशा दर्गा ट्रस्ट कमिटीने दिली.

गेली दोन ते तीन वर्षापूर्वी कोरोना चा भयंकर असा महा प्रकोप राज्य तसेच भारतात कोरोनाच्या माध्यमातून आला होता त्यामुळे दर्गाह परिसरात शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे नियम पाळत कोणताही धार्मिक कार्यक्रम भरीवला गेला नव्हता मात्र तदनंतर ४ वर्षाच्या कालखंडानंतर सध्या उरूस कलंदर चा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

उरूस कलंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 1 मे रोजी दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टने दिली सदर धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गा परिसरात विविध रंगाचे ची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ हिंदू तसेच मुस्लिम भक्तगण ही मोठ्या संख्येने घेत असतात सदर धार्मिक कार्यक्रम बरोबर दरगाह मध्ये मोफत अन्नदान अर्थात महालगरखाना याचेही आयोजन करण्यात आले आहे

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पानिपत येथील शेख शरफुद्दीन बु अली शाह कलंदर पानिपत यांच्या स्मरणार्थ दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातून देखील हिंदू-मुस्लीम भक्तगण मोठ्या संख्येने सदरच्या कार्यक्रमाला हजेरी लावून हिंदू-मुस्लीम एकोपा कायम ठेवतात

हेही वाचा – गावच्या सूनबाईची गावात पोस्ट मास्तर म्हणून नेमणूक; निंभोरेकरांनी केला सन्मान

करमाळा तालुक्यातील ‘या’ प्रश्नासाठी मे महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार; पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन वली बाबा दर्गा ट्रस्ट कमिटी तसेच आवाटी येथील समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

litsbros

Comment here