करमाळामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

तालुक्यात वाढला उन्हाळा; रासायनिक शितपेयांपेक्षा लोकांची पारंपारिक पेयांना पसंती!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्यात वाढला उन्हाळा; रासायनिक शितपेयांपेक्षा लोकांची पारंपारिक पेयांना पसंती!

केत्तूर(अभय माने); यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली होती परंतु मध्यंतरी वातावरण बदलामुळे अवकाळी पाऊस व गारपीटीनंतर तापमान काही अंशी कमी झाले होते.

मार्चमध्ये मात्र उष्णतेचा पारा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. साधारणपणे उष्णतेचा 36 ते 38 अंश सेल्सिअसपुढे जात असल्याने उष्णतेत वरचेवर वाढ होत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचा कल मात्र थंड पेयाकडे वाढला आहे. यामध्ये रासायनिक प्रक्रिया केलेल्या पेयांची दुकानेही थाटली आहेत.

हेही वाचा – राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळयात काँग्रेसचे जेल भरो आंदोलन; अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक

करमाळा तालुक्याचे सुपुत्र नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचे झांसी येथे दुख:द निधन; मूळ गावी झरे येथे होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

परंतु ती थंडपेय घेण्यापेक्षा उसाचा रस, लिंबू सरबत ,लस्सी, ताक घेणे शरीराला चांगले असल्याने नागरिक नागरिकांचा कल ते घेण्यासाठी जास्त आहे.आईस्क्रीम इतर थंड पेय घेतल्यानंतर पुन्हा तहान लागत आहे

ग्रामीण भागात लहान बच्चे कंपनीचा मात्र बर्फाचे गोळे,कुल्फी,गारेगार, पेप्सी हे घेण्याकडे त्यांचा कल आहे.

litsbros

Comment here