करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
उजनी लाभक्षेत्रात थंडीचा जोर वाढू लागला
केतूर (अभय माने): करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात उजनी लाभक्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसापासून धुक्याची चादर पसरत आहे. तापमानात वरचेवर घट होत आहे. त्यातच सायंकाळी थंडगार वारे वाहत असल्याने पहाटे व रात्री थंडीचा जोर वाढला आहे. थंडीमुळे रात्री घराबाहेर पडणे अवघड होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने थंडी कमी प्रमाणात जाणवणार असे वाटत होते परंतु ही आशा मात्र फेल ठरताना दिसू लागली आहे.
वाढत असलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे परंतु भाजीपाला पिकांना मात्र फटका बसणार आहे.
Comment here