करमाळाक्रीडासोलापूर जिल्हा

करमाळा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री.राजेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री.राजेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश

केतूर (अभय माने) क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजत शालेय तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे पडल्या.

सदर मैदानी खेळामध्ये श्री राजेश्वर विद्यालयातील २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मैदानी खेळातील विविध खेळातील पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

८० मीटर हर्डल या खेळ प्रकारात १४ वर्ष वयोगट मुली-प्राची शहाजी दुरंदे (द्वितीय क्रमांक) स्नेहल सुरेश शिंदे (तृतीय क्रमांक)
१०० मीटर हर्डल या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुली-स्नेहल सुरेश शिंदे (द्वितीय क्रमांक)प्राची शहाजी दुरंदे (तृतीय क्रमांक)
400 मीटर हर्डल या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुले- अक्षय समीर दुरंदे (द्वितीय क्रमांक) शाम संजय साखरे (तृतीय क्रमांक)

रिले ४ X ४०० १७ वर्ष वयोगट मुले – शाम संजय साखरे, रोहन राजेंद्र काळे, अक्षय समीर दुरंदे, साहिल नजीर शेख, प्रणवकुमार संजय गायकवाड (व्दितीय क्रमांक)
३ किलो मीटर चालणे या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुली- ज्ञानेश्वरी पांडुरंग खैरे (प्रथम क्रमांक) व नम्रता पांडुरंग गरदडे (तृतीय क्रमांक)

हॅमर थ्रो या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुले – प्रणव बाळासाहेब मुळीक (प्रथम क्रमांक) व साहिल नजीर शेख (द्वितीय क्रमांक)
हॅमर थ्रो या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुली – दिव्या दादा बुधवते (तृतीय क्रमांक)
ट्रिपल जंप (तिहेरी उडी) या खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगट मुले – समाधान बिभीषण अनारसे (प्रथम क्रमांक) व रोहन राजेंद्र काळे (द्वितीय क्रमांक) या प्रमाणे यश संपादन केले. क्रीडा मार्गदर्शक शिक्षक श्री. मारूती साखरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी ‘इतके’ कोटींचा निधी मंजुर; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

नगर व सोलापूर जिल्ह्यातील बंधारे अन् मोठे तलाव बेकायदेशीररित्या भरल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अनिल झोळ, संस्थापक सचिव श्री. लालासाहेब जगताप सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राजुरी ग्रामस्थ यांनी यशस्वी खेळाडूंचे अभनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here