करमाळामाढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटना अधिनस्त ‘ माढा तालुका कार्यकारिणी गठीत जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड यांची माहिती.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्हा इंग्रजी भाषा शिक्षक संघटना अधिनस्त ‘ माढा तालुका कार्यकारिणी गठीत जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड यांची माहिती.

केत्तूर ( अभय माने) नुकतीच टेंभूर्णी (ता. माढा) येथे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत माढा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रा.किशोर कुंडलिक शिंदे यांची माढा तालुका इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर प्रा.श्रीमती प्रमिला सहदेव वाघमारे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सचिवपदी प्रा.सुनिल मोहन गोसावी यांची तर सहसचिव म्हणून प्रा.श्रीकांत अशोक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.श्री .आबासाहेब दाढे जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. गुरूनाथ मुचंडे , करमाळा तालुका इंग्रजी भाषा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

हेही वाचा – पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

त्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सन्मान मा.जिल्हाध्यक्ष प्रा.गुरुनाथ मुचंडे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब दाढे, कल्याणराव साळुंके यांनी केला. याप्रसंगी माढा तालुक्याचे वतीने सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

litsbros