श्री उत्तरेश्वर कॉलेज केम येथे साने गुरुजी कथामाला अभ्यास वर्गाची उत्साहात सुरुवात
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
– श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम याठिकाणी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सोलापूर केंद्र अंतर्गत अभ्यास वर्गाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना साने गुरुजी यांचा जीवनपट , त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी प्रबोधन केले .
यावेळी या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ हे समूहगीत गायन केले.
महाविद्यालयीन जीवनात साने गुरुजी यांच्या विचारांची , या कथामालेतील संस्काराची आजच्या या तरुण पिढीला खूप गरज आहे.
विद्यार्थ्यांचे अशा संस्कार केंद्रात आपले चारित्र्य व चरित्र जोपासणे सोपे होते. या उद्देशाने उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये या अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे यांनी यावेळी सहकार्य केले.
Comment here