कोढारचिंचोली येथे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
केत्तूर (अभय माने) : कोंढारचिंचोली (ता.करमाळा) येथे 77 वा स्वतंत्रदिवस (15 ऑगस्ट ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जि.प. प्रा. शाळेतील ध्वजारोहणाचा मान विद्यमान सरपंच शरद नाथसाहेब भोसले यांनी गावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र वसंत गलांडे (ACP) व माजी सैनिक प्रमोद सुभाष भोसले, अरुण गणपत गोडगे, भरत गणपत गोडगे यांना संयुक्तरित्या दिला व ग्रामपंचायत येथील ध्वजारोहणाचा मान
गावचे विद्यमान उपसरपंच अड.श्रीराम कांतीलाल गलांडे यांनी माजी सैनिक नाथसाहेब शंकर गलांडे यांना देउन सरपंच व उपसरपंच यांनी समजापुढे चांगला आदर्श ठेवला व परिसरातील सरपंच-उपसरपंच यानीही यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक वृंद, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment here