श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केम प्रतिनिधी –शुक्रवार दि 15 डिसेंबर 2023 रोजी श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुरूवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे, सागर कुर्डे ग्रामपंचायत सदस्य केम, युवासेना अध्यक्ष सागरराजे तळेकर, भाजप अध्यक्ष गणेश आबा तळेकर यांनी छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांचा स्वागत सत्कार केला.
विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात समाजामध्ये चांगला बदल घडवा आई-वडिलांचे स्वप्न साकार करा असे अनमोल प्रतिपादन महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले आणि उपस्थितांची मने जिंकली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर, सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य धनंजय ताकमोगे सागरराजे तळेकर
मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना
युवासेना अध्यक्ष, सागर कुर्डे ग्रामपंचायत सदस्य केम, विजयसिह ओहळ ग्रामपंचायत सदस्य केम, दळवी सर, विष्णुपंत अवघडे ग्रामपंचायत सदस्य केम, दिपक भिताडे ,बापू तळेकर तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एन वाघमारे सर यांनी केले.
Add Comment