सोलापूर जिल्हा

मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी
सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना

सोलापूर : सोलापूर तुळजापूर रस्त्यावर उळे व तामलवाडी यांच्या दरम्यान कासेगाव हद्दीत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर सदर दुर्घटना घडली आहे.
सोलापूरहून तुळजापूरकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकच्या समोर अचानक म्हशी आल्याने ट्रक त्यांना धडकून रस्त्याखाली पलटी झाली. ट्रकच्या धडकेने कासेगाव येथील शेतकरी लखन वानकर यांच्या 5 गाभण म्हशी मृत पावल्या आहेत. यात वानकर यांचे सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले आहे.


मालवाहतूक ट्रक व्हीआरएल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीची आहे. घटना घडताच ड्रायव्हर गायब झाला आहे.

litsbros

Comment here