माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री खिलोबा विद्यालयाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न संस्थेचे सचिव सुभाष नागटिळक यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री खिलोबा विद्यालयाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

संस्थेचे सचिव सुभाष नागटिळक यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील श्री अन्नपूर्णा शिक्षण प्रसारक मंडळ मानेगाव संचालित श्री खिलोबा विद्यालयाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.संस्थेचे सचिव सुभाष यांच्या सर यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी श्री खिलोबा विद्यालय हे अनेक उपक्रम राबवत आहेत.गेल्या महिन्यापासून हा कार्यक्रम चांगला यशस्वीपणे होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.


मराठी हिंदी गीतांबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून सामाजिक संदेश देखील गावकऱ्यांना दिले.शिट्ट्या आणि टाळ्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.प्रेक्षकांनी आपल्याला आवडल्या गाण्यावर बक्षीसांचा वर्षाव देखील केला.नियोजनबद्ध आणि खूप चांगला कार्यक्रम झाल्यामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांची कौतुक केले.

हेही वाचा – ३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलाकर दावणे यांचा धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

या कार्यक्रमासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ,अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, माजी विद्यार्थी, तरुण वर्ग व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विनोद काळे सर ,राजेंद्र वाघमारे सर प्रदिप कसबे सर , देशमुख सर , काळे मॅडम , कोरके मॅडम ,सुनिल कोरके व अर्चना गायकवाड व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक विनोद काळे सर यांनी केले.

litsbros

Comment here