करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

पंडित कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पदी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंडित कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पदी निवड

करमाळा (प्रतिनिधी)- फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे विचाराचे मा. पंडित (अण्णा) कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पदी निवड झाली या निवडीचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले राष्ट्रवादी मुंबई प्रदेश कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एड. जयदेवराव गायकवाड हे होते

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले कि , पंडित कांबळे यांची निवड योग्य निवड झाली असून कांबळे यांचे सामाजिक न्याय विभागात गेले वीस वर्षे पासून चांगले काम असून त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी निर्माण केली आहे व त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल कांबळे हे उच्चविद्याविभूषित असून राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे पाटील म्हणाले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कांबळे बोलताना म्हणाले की पक्षाने मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने माझी पहिल्यापेक्षा खूप मोठी जबाबदारी वाढली आहे भविष्यकाळात पक्षाला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बळकटी देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे

हेही वाचा – सोमनाथ ओहोळ लिहितात.. ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक म्हणजे सर्वांना, सर्वांचे बाबासाहेब सांगणारे पुस्तक

करमाळा एस टी आगारासाठी तातडीने ३० नवीन बस द्या; माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वाचा सविस्तर

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एड. जयदेवराव गायकवाड कार्यालयीन सचिव रवींद्र पवार हेमंतजी टकले डॉ. रमेश चंदनशिवे संजय गायकवाड संजय बोरकर योगेश सोनवणे दिगंबर कवडे शामराव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष व सामाजिक न्याय विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here