आम्ही साहित्यिककेमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन वर्ष पाचवे केम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन वर्ष पाचवे केम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न

केम- शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन वर्ष पाचवे श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते  गणेशभाऊ करे पाटील, प्रमुख पाहुणे बीडीओ मनोज राऊत आणि स्वागताध्यक्ष मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, दिलीपदादा तळेकर, अच्युतकाका पाटील,  दशरथआप्पा तळेकर, राहुल कोरे, सुलतान मुलानी यांच्या हस्ते झाले.


या साहित्य संमेलनात प्रारंभी सर्व पाहुण्यांच्या हस्ते परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडी पूजन करून केम गावातून पाथूर्डी भजनी मंडळ व श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मंडळी यांनी फेटे घालून, मुलींनी साड्या परिधान करून भव्य शोभायात्रा काढली.
उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे श्री गणेश करे पाटील यांनी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास सांगून ग्रामीण भागात होणाऱ्या या संमेलनाचे कौतुक केले. श्री मनोज राऊत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी,त्यासमोरील आव्हाने सांगून त्यावर प्रबोधन केले. मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी या डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली. या साहित्य संमेलनातून घडणारे विद्यार्थी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास हेच या संमेलनाचे ध्येय असल्याचे सांगितले.


त्यानंतर प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते , महाराष्ट्राचे आधुनिक गाडगे महाराज श्री फुलचंद नागटिळक यांचे नटसम्राट नाटिका, प्रा.डॉ. अविनाश ताटे यांचे कथाकथन, परिसंवाद, श्री विकास कळसाईत यांची मैफिल गाण्यांची अशी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी होती.
शेवटच्या सत्रात पार पडलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद श्री युवराज नळे यांनी भूषवले. या कवी संमेलनात दिग्गज कवीनी सहभाग नोंदविला. प्रा.डॉ.शिवाजीराव गायकवाड, श्री राजाभाऊ कारंडे, श्री प्रकाश गव्हाणे, श्री बाळू घेवारे, श्री प्रकाश लावंड, श्री खलील शेख, श्री सोमनाथ टकले, डॉ अंकुश तळेकर, श्री दयानंद तळेकर, सौ राजश्री मोरे, कु.प्रज्ञा दीक्षित , कु.सानिका तळेकर इत्यादी कवी मंडळींनी आपापल्या आगळ्यावेगळ्या ज्वलंत विषयावरील कवितावर रसिकांची उत्स्फूर्तपणे दाद मिळविली.

हेही वाचा – शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

करमाळा कुटीर रुग्णालयाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

हे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्राचार्य श्री सुभाष कदम, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, केम ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.

litsbros