सरपडोह येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी
केम(प्रतिनिधी संजय जाधव)
सरपडोह ता. करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय सरपडोह व जि.प. शाळा सरपडोह येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, पत्रकार सिध्दार्थ वाघमारे आदिजन उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार गावच्या सर्व प्रमुख मंडळींच्या हस्ते करण्यात आले. यानंतर जि.प.शाळा सरपडोह मुख्याध्यापक नारायण डौले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा उपस्थित गावकऱ्यानी सत्कार केला. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना डौले सर यांनी सांगितले कि, कोणत्याही महापुरुषांची जयंती आपण एक दिवस मोठा गाजावाजा करुन साजरी करतो.
परंतु त्यांचे आचार-विचार आपण अंगी का बाणवत नाही? बहुजन समाजासाठी अहोरात्र ज्या-ज्या महापुरुषांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले आहे. अशा सर्व महापुरुषांच्या विचारांची जयंती सर्वांनी ३६५ दिवस साजरी केली पाहिजे. तरच या सर्व महापुरुषांना त्यांच्या जयंतीदिनी खरे अभिवादन ठरेल. अशाप्रकारे मुख्याध्यापक डौले सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
तर सिध्दार्थ वाघमारे यांनी त्यांचे विचार व्यक्त करताना सांगितले कि, महापुरुषांना समाजा-समाजामध्ये कोणी ही वाटून घेऊ नका. कारण या सर्व महापुरुषांनी बहुजन समाज एकसंध रहावा. म्हणुन त्यांनी त्यांच्या संपुर्ण आयुष्याची आहुती दिली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही जातीभेद पाळला नाही.
त्यामुळे आता इतर जातीधर्माचे नागरिकसुध्दा सर्वच महापुरुषांच्या जयंतीमध्ये हिरीरीने सहभाग घेत आहेत. अशावेळेस इतर सर्वच समाजाने अशा सर्वसमावेशक जयंतीमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. अशाप्रकारे पत्रकार वाघमारे यांनी त्यांचे मत मांडले
ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमानंतर जि.प.शाळेतील छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा – हिंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव जाधव बिनविरोध, तर संचालक पदी..
या कार्यक्रमासाठी मालन पांडूरंग वाळके- सरपंच, अंकुश खरात-पोलीस पाटील, भानुदास शिंदे- ग्रा.पं. सदस्य, बाळू गवारे-सदस्य, सोरटे सर, गदादे सर, अनिल आरणे- सामाजिक कार्यकर्ते, दादा क्षीरसागर, भीमराव मोरे, लहू पवार, भारत भिताडे, बापू मोरे, मनोहर रंदवे, दशरथ भिताडे, शंकर मोरे- ग्रा.पं. शिपाई तसेच गावातील वयोवृध्द, तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सदरील सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संतोषनाथ आरणे महाराज यांनी केले.
Comment here