सांगोलासोलापूर जिल्हा

दुर्दैवी! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू  

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू  

सांगोलामध्ये वावटळीत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. झोळी उडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. जवळा येथील लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास जवळा येथील लेंडी ओढ्यात ही दुर्घटना घडली. कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद ता. सांगोला) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबार शोककळा पसरली आहे. 

अचानक आलेल्या वावटळीत पालासकट झोळी उंच उडून पुन्हा पाल खाली कोसळून झोळीत झोपलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळी मृत चिमुकलीच्या आई-वडिलांसह आजोबा नातेवाईकांनी टाहो फोडल्याने उपस्थितांना ही अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळताचा आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दुर्घटनेची माहिती घेऊन निंबाळकर चव्हाण कुटुंबियांना धीर देऊन शोक व्यक्त केला.

सोनंद येथील साधू अण्णा चव्हाण हे पत्नी व मृत मुलगी कस्तुराला सोबत घेऊन काल गुरुवारी सकाळी जवळा ता. सांगोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता आले होते. उपचारानंतर पती-पत्नी मुलगी आजोबा रमेश भीमा निंबाळकर यांच्या जवळा- घेरडी रोड वरील लेंडी ओढ्याच्या पटांगणात टाकलेल्या पालावर आले. त्या ठिकाणी सासुरवाडीचा पाहुणचार घेतला. बाहेर प्रचंड उन्हामुळे पती-पत्नी पालात विश्रांती घेत होते. तर मुलगी कस्तुराला पालातील झोळीत झोपवले होते. दरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास अचानक जोरदार आलेल्या वावटळीत झोळी सकट पाल उंच हवेत उडाले.

उपचारापूर्वीच मृत्यू

पालातील चव्हाण -निंबाळकर कुटुंबियांना धुळीमुळे काही समजण्याच्या आत हा प्रकार घडला. आरडाओरड करत वावटळीकडे उंच पाहत असताना पालासकट झोळी खाली कोसळून ही घटना घडली. गोंधळामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झोळीत झोपलेली कस्तुरा खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तिला उपचाराकरता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, सरपंच सुषमा घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण घुले पोलीस पाटील अतुल गयाळी, तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबाला धीर देऊन घटनेचा पंचनामा करून शासकीय मदतीसाठी तहसील कार्यालय सांगोला येथे पाठवून दिला.

litsbros

Comment here