क्राइमपुणे

तरुणाला पकडून मलमुत्र खाऊ घातलं , आरोपीत चार महिला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तरुणाला पकडून मलमुत्र खाऊ घातलं , आरोपीत चार महिला

पुणे जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना इंदापूर तालुक्यातील काटी इथे समोर आलेली असून लग्न आणि हुंडा यातील वाद विकोपाला गेल्यानंतर एका 21 वर्षाच्या तरुणाला मारहाण करत लिंबू आणि हळद लावून शिव्याशाप देत चक्क मलमूत्र खाण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. दहा जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यामध्ये तब्बल चार महिला देखील आरोपी आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, स्वप्नाली शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे, दिनेश शिंदे ,बापूराव शिंदे ,कासलिंग बापूराव शिंदे ,अजय पवार ,लखन काळे ,दिनेश शिंदे यांचा मुलगा ,मंदा काळे ( सर्वजण राहणार काटी तालुका इंदापूर ) व अतुल काळे ( राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ) अशी आरोपींची नावे आहेत तर या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

21 वर्षांचा फिर्यादी युवक हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी असून तीन वर्षांपूर्वी त्याचे आरोपीच्या मुलीसोबत लग्न जमलेले होते मात्र हुंड्याच्या कारणावरून मुलीच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध केला आणि इतरत्र तिचे लग्न जमवले. दरम्यानच्या काळात मुलगी आणि फिर्यादी व्यक्ती यांच्यात चांगले ट्युनिंग जमलेले होते त्यामुळे दहा एप्रिल मुलगी आणि फिर्यादी हे घरातून पळून गेले. मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला त्यानंतर पकडून त्यांना पुन्हा 19 एप्रिल रोजी काटी इथे आणण्यात आलेले होते.


पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाला गावात आणल्यानंतर फिर्यादी यांच्याकडे मुलीच्या नातेवाईकांनी पाच लाख रुपये हुंडा मागितला मात्र युवकाने त्यांना नकार दिला त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. देवाच्या नावाने आरडाओरडा करत फिर्यादी यांना लिंबू आणि हळद लावून शिव्याशाप देण्यात आले त्यानंतर नवऱ्या मुलीसोबत आणि आरोपी महिलांसोबतही त्याला लज्जास्पद कृती करायला लावले. मानवी विस्टा आणि लघवी पिण्यासारखे देखील कृत्य त्याला करण्यास भाग पाडले. आरोपी महिलेने या घटनेचा व्हिडिओ बनवून आपल्या फेसबुक वर देखील शेअर केलेला आहे असे देखील तक्रारदार व्यक्ती यांचे म्हणणे आहे सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत असल्याची माहिती आहे.

litsbros

Comment here