महाराष्ट्र

दुर्दैवी; शेततळ्यात पडून सख्ख्या भावांचा मृत्यू 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी; शेततळ्यात पडून सख्ख्या भावांचा मृत्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधवाना पाण्याची अडचण होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शेततळी बनवलेली आहेत, मात्र शेततळ्यांच्या सुरक्षिततेकडे सर्रास दुर्लक्ष होत असून शेतकरी बांधव देखील हा प्रकार गांभीर्याने घेत नाहीत. मात्र त्यातून दुर्घटना घडत असून  नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात  दोन भावंडांना यामध्ये प्राण गमवावे लागलेले आहेत. दोन्ही सख्ख्या भावंडांचा यात मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोककळा पसरलेली आहे.


आर्यन बंडोपंत साळुंखे ( वय 9 ) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे ( वय आठ ) अशी तळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही भावंडांची नावे आहेत. आई वडील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेलेले असताना दोन्ही भावंडे घरी होती. ते शेतात शेततळ्याजवळ खेळत होती त्यावेळी सुरुवातीला अनिकेत शेततळ्यात पडला हे पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याच्या लहान भावाने देखील त्याला हात दिला मात्र दोघेही  पाण्यात पडले.
परिसरातील युवकांनी देखील पाण्यात उड्या घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अखेर यश आले नाही. नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेततळे असली तरी त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. आतापर्यंत अनेकदा शेततळ्यात अनेक जणांनी प्राण गमावलेले असून शेततळ्याच्या बाजूला सुरक्षा जाळी आवश्यक आहे तसेच शेततळ्याच्या मधोमध शेततळ्यात पडल्यानंतर बाहेर येण्यासाठी देखील पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे असताना शेततळ्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे शेतकरी बांधव तुलनेत किरकोळ असलेल्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत.

litsbros

Comment here