दुःखद – करमाळा तालुक्यातील साडे येथे झिरो वायरमन कर्मचाऱ्याचा विजेच्या खांबा वरून पडून मृत्यू
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील साडे येथे सालगुडे वस्ती जवळ एका झिरो वायरमन कर्मचाऱ्यांचा विजेच्या खांबा वरून पडून मृत्यू झाल्याची कळबळजनक घटना घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्या सहित साडे परिसरात काही ठिकाणी पाऊस झाला होता या वादळी वाऱ्याच्या तडाका विजेच्या खांबांना बसून अनेक विजेच्या खांबावरील वायर तुटली होती.
सदर तुटलेले वायर जोडण्यासाठी साडे येथील पांडुरंग शंकर कदम 58 वय हे झिरो कर्मचारी तुटलेले वायर जोडण्यासाठी खांबावर चढले होते तदनंतर विजेच्या प्रचंड प्रवाहामुळे ते खांबावरून खाली पडले त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यांची दोन दिवसांनी प्राणज्योत मालवली.
सदरची घटना 27 मे रोजी घडली होती तदनंतर दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले त्यांच्यावर साडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत.
साडे येथे सध्या नेमून दिलेले विद्युत वायरमन कर्मचारी कधीही विजेच्या कामासाठी येत नसून नाईलाज म्हणून शेतकरी वर्गांना झिरो कर्मचाऱ्याकडून आपली विजेची कामे पूर्ण करावी लागतात सदरची घडलेली घटना ही विद्युत वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याचे ग्रामस्थांनी करमाळा माढा न्यूजशी बोलताना सांगितले.
Comment here