करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

प्रचाराचा धुरळा : एकच दिवस बाकी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*प्रचाराचा धुरळा : एकच दिवस बाकी*

केत्तूर ( अभय माने) 244 करमाळा माढा मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचाराचा धुराळा उडाला असून सर्व उमेदवार व त्यांचे समर्थकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये उमेदवाराची पत्नी, भाऊ, बहीण,मुलगा, मुलगी, या इतर नातेवाईकांनीही प्रचारामध्ये उडी घेतली आहे. प्रमुख गावात प्रचार सभा तसेच पदयात्रा झालेल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शरद पवार यासारख्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभाही पार पडल्या आहेत.

करमाळा माढा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे (सफरचंद) हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून मतदारासमोर जात आहेत. तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील (तुतारीवाजवणारा माणूस),महायुतीकडून दिग्विजय बागल (धनुष्यबाण) व रामदास झोळ अपक्ष (रिक्षा) यांच्यामध्ये चौरंगी सामना होत आहे. एकूण 15 उमेदवार असले तरी, दोन अपक्ष उमेदवारांनी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना आपला पाठिंबा दिलेला आहे.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने जाहीर प्रचाराची सांगता 18 नोव्हेंबरला होत आहे.

आता जाहीर प्रचारासाठी केवळ एकच दिवस राहिल्याने उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरी लागली आहे. आता आपापल्या गावात मतदार वळविण्याची धडपड सुरू झाली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात हव्वा कुणाची ? अशी चर्चा होत आहे सर्व उमेदवारांनी विकास कामाचा मुद्दा महत्त्वाचा केला आहे.या निवडणुकीत तरुण संख्येने दिसत नसले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काम चोख बजावत आहेत.

हेही वाचा – करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात करा; माजी नगरसेविका सविता कांबळे

राजकीय वातावरण तापले : राजकीय चर्चांना ऊत

मतदार संघातील 144 गावं तसेच वाड्या – वस्तीवर पोहोचण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने उमेदवारांची अवस्था मात्र ” रात्र थोडी सोंग फार ” अशी दिसून येत आहे. रात्री दहा नंतर प्रचार संपल्यानंतर कार्यकर्ते व उमेदवार पुढील प्रचाराची व्युहरचना ठरवीत आहेत.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!