महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांनी काकांना दिला ‘ हा’ सल्ला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अजित पवारांनी काकांना दिला ‘ हा’ सल्ला

राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन धक्कादायक घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून आणलं. तसेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार आमनेसामने आले आहेत. त्यातच आज मुंबईत दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी अजित पवार यांनी वयावरून पवारांवर टीका केली.
अजित पवार म्हणाले की, २ मे ला म्हणाले मी राजीनामा देतो. राजीनामा दिल्यानंतर एक कमिटी करतो, म्हणाले. त्यातच सर्व बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा म्हणाले. त्यालाही आम्ही होकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी सांगितलं राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता तर राजीनामा दिला का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील जनतेने सांगावं आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का? आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही. घरात देखील ६० वर्षानंतर २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं, आता तू सर्वकाही पाहायचं. आम्ही तुला सल्ला देतो. हीच सगळीकडे पर्याय आहे. परंतु, आता हट्ट केला जातो. मी सुप्रियाशी बोललो. साहेबांना काही तरी सांग. ती बोलली ते कोणाच ऐकत नाही. असा कसला हट्ट आहे. हे कुठ तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
काही आमदारांना बोलवून घेतलं जातं. त्यांना भावनिक केलं जातं. वरिष्ठ नेते म्हणतात, तु निवडून कसा येतो, अस बोलतात. नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व देशात आहे. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप सत्तेत आलं. परदेशात गेल्यानंतर मोदींचं उत्साहत स्वागत करतात. देशात मोदींशिवाय पर्याय नसेल तर त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला.

मध्यंतरी त्यांनीच सांगितलं २०२४ ला मोदीच निवडून येतील. हे त्यांनीच सांगितलं. मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं. मनात अनेक गोष्टी आहेत. त्या राबविण्यासाठी मुख्यमंत्रीपद लागतं. आता राष्ट्रवादीला २५वे वर्ष सुरू झाले आहे. आम्हाला सांगण्यात आलं की, पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात घेणार आहेत. मग मला पण सभा घ्यावी लागेल. मी गप्प बसलो तर जनता म्हणले, यात खोट आहे. वरिष्ठाना विनंती आहे की, आराम करावा. हट्टीपणा सोडून द्यावा. मी आज थोडं बोललो. उद्या त्यांनी सभा घेतल्या, तर मलाही बोलावं लागेलं, असा इशारा अजित पवार यांनी शरद पवारांनी दिला.

litsbros

Comment here