करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पदी तनपुरे तर व्हॉईस चेअरमन पदी बदे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पदी तनपुरे तर व्हॉईस चेअरमन पदी बदे

करमाळा(अलीम शेख); करमाळा तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख असणारी माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थे ची नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली होती.

या पतसंस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी काल मंगळवारी सकाळी11 वाजता करमाळा येथे सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात पार पडली त्यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सौ मुंढे मॅडम यांनी काम पाहिले.

चेअरमन पदासाठी सालसे येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल च्या सौ मनीषा सपकाळ तनपुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने आणि व्हॉईस चेअरमन पदासाठी उमरड येथील वामनराव बदे हायस्कूल चे श्री कांतीलाल बदे यांचाही एकमेवअर्ज आल्याने दोघांचीही विनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सौ मुंढे म्याडम यांनी जाहीर केले.

या निवडी वेळी नूतन संचालक सुनिल जाधव किरण परदेशी दत्तात्रय भागडे सुहास गायकवाड साहेबराव आर्किले नानासाहेब नीळ सौ ज्योतो चव्हाण श्रीकांत नलबे आणि सचिव पांडुरंग वाघमारे हजर होते.

हेही वाचा – आ.बबनराव शिंदे यांचेकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 1 लाखाची मदत मानेगाव येथील संस्कृती मोटे व दिपक गावडे यांना दिले प्रत्येकी 50 हजार

देवदर्शनाहून परतताना झालेल्या भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 7 जण जखमी

नूतन चेअरमन व व्हॉईस यांचे पतसंस्थे माजी चेअरमन व मार्गदर्शक यशवंतराव लावंड माजी चेअरमन किरण किरवे माजी उपाध्यक्ष रशीद पठाण सालसे येथील न्यू यशवंत शिक्षण संस्थे चे सचिव रवींद्र सपकाळ कंदर येथील कण्हमुनी हायस्कूल चे माजी प्राचार्य बापू पवार पतसंस्थे चे माजी संचालक पोपट माने तसेच तालुक्यातील सर्व हायस्कूल मधील मुख्यध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

litsbros

Comment here