आम्ही साहित्यिक

थोडसं वैष्णवांच्या संगती                          *********      ( आषाढी वारीच्या निमित्ताने थोडसं… )

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

थोडसं वैष्णवांच्या संगती

                         *********

     ( आषाढी वारीच्या निमित्ताने थोडसं… )

 पूर्वीच्या काळी सावकाराला त्याच्या सुनेसाठी 14 किलो सोन्याचे दागिने करावयाचे होते त्याचं काय झालं सून काय एकाच दिवशी सगळे दागिने घालणार नव्हती आळीपाळीने घालणार होती त्याच्यामध्ये गळसरी… कळसुत्री… कटी सूत्री …कटी मेखला… गरबंध …पाचू…गड पद …आश्रित पदक…कंठ …कर्ण बिंद…कर्ण कुंडल…कर्ण पाचू…पूर्ण मेखला…रूम मेखला…रूम साध्वी… म्हणजे बिंदी… पेटारी आणि पुतळ्या अशा प्रकारचे ते दागिने होते.

              त्या काळच्या एका म्हाताऱ्याने एक लग्न सांगितलं त्या लग्नांमध्ये मुलाच्या आजोबांनी घरूनच शेवंती घोडीला मांडवाच्या उजव्या कोपऱ्यात बांधल्यावर अठरा तोळ्याची मेख लगाम बांधायला पुढून ठोकली होती पावणेदोन तोळ्याची मेख पाय बंदा साठी मागून ठोकली होती त्या सोनाराने सात किलो चे दागिने करून दिले लग्न परवा दिवशी सकाळी आहे राहिलेले सात किलो चे दागिने द्या हे सोनार दादा उद्या सकाळी येतो सात किलो चे दागिने द्या नाहीतर माझी दिशाभूल केली म्हणून सात किलोचा दंड तुम्हाला द्यायला लागेल त्या काळातला सोनार…त्या सोनाराचं नाव होतं सद्गुरु नरहरी महाराज संध्याकाळी दुकान बंद केल्यावर घरी आले व जेवण करायला बसले ताटाला नमस्कार करून चित्रावळ घातली व पाया पडून उठले बायको म्हणाली काय झालं त्यांनी सांगितलं जेवलं की झोप लागते झोप लागल्यावर काम करणं शक्य नाही एक सोनार रात्र भर सोनं आटवून फार फार तर पाऊण किलोचे दागिने बनवायचा आता एका रात्रीत दीड क्विंटल चे दागिने मशीनवर बनवतोय आता त्याच्यामध्ये लगड तापवायची त्याची पट्टी करायची पट्टी मिळवायची त्या पट्टीला चमड्यातून कस द्यायचा चमडा त्याला तेज द्यायचा अगोदर माहीत असतं आणि कामाचा असा ताण झाला नसता तर माझे पाच-सात मित्र घेतले असते रात्री काम केलं असतं दुकानाच्या चाव्या घेतल्या विटेवरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतलं वडिलांचा फोटो भिंतीवर होता आता मेलेल्या माणसांचे फोटो दक्षिणमुखी असावेत वाघाने उघडलेलं तोंड… घोड्याचे चित्र… घरात नसावं हा सिद्धाी आणि हातोडीने सोनं ठोकायला सुरुवात झाली अकरा वाजता बाहेरून दरवाजा ठोठावला आवाज दिला दुकानदार दार उघडा…दुकानदार दार उघडा…नरहरी महाराज भीतीने घामाघुम झाले कारण सोनाराचे दुकान म्हणजे नाही ती जबाबदारी घामानी अंग पार वल्लं झालं होतं सोनार म्हणाला दुकान उघडत नाही बाहेरचा म्हणाला फक्त एकदा दाराच्या फटीतून बघा अजून काही दिसेना एका फळीला छोटसं छिद्र वरच्या बाजूला होतं त्यातून पाहिलं तर काळ्याकुट्ट अंधारात चेहरा फक्त चमकत होता अरे बापरे ती म्हणालं अरे बापरे चोराचा चेहरा चमकाय लागला आता काय करावं आणि पुन्हा काम करायला सुरुवात झाली पुन्हा आवाज आला उघडा दुकानदार मला आत घ्या त्या छिद्रातून बघितलं चेहरा पुन्हा चमकला शेवटी कंटाळून महाराज खाली बसले सोनं घडवू लागले पुन्हा आवाज आला चोर नाही हो वाटसरू आहे मला सुद्धा सोनं घडवता येतं तुम्हाला मदत करण्यासाठी मी आलोय मला आत मधी घेऊन कुलूप लावा चावी तुमच्याजवळ ठेवा व आत घ्या मला… पण विचार केला अंधारात चेहरा चमकत व्हता चेहरा माणसाचा नव्हता त्या विटेवर च्या मालकाचा होता.

            त्याला आत घेतलं कुलूप लावलं आणि चावी स्वतःच्या जाणव्याला अडकवली आणि खटा खटा सोनं घडवू लागले त्या विटेवरच्या मालकांनी सोन्याची लगड तापवायची आणि गरम गरम लाल झालेली सोन्याची लगड हाताने दाबली की क्षणात पाटली तयार हाताला खूप पोळायचे…नरहरी सोनारा फुंकू लागले घडवू…हाच मोठा पुरावा आहे गडबडीत गडबडीमध्ये काय व्हायचं लगड गरम झाल्यावर हाताने दाबल्यावर पोळायचं त्या गडबडीत लगड हातातून पाडायची मग काय व्हायचं पितांबर जळायचा पहाटे पावणेतीन वाजता सगळं सोनं आटवून घेतलं आणि म्हणाले मी आता जातो…नरहरी महाराज म्हणाले एवढ्या अंधारात कुठे जाता तर ते म्हणाले महाराज मला जावं लागतंय का म्हणून जावं लागतंय माहिती आहे का कारण वाळवंटी त्याच्या अंघोळीला बरेच जण थांबले होते पुष्कळजण थांबले होते कोण कोण होते माहिती आहे का तर त्रिशूल डमरू घेऊन शंकर आले होते…सुरवरांची दाटी उभी जोडूनी हात…त्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत उभी जोडूनी हात… त्या कामाच्या घाई मध्ये पितांबर 2-4 जागेवर जळालेला तसाच घडी घालून कोपऱ्यात ठेवलेला पण देवाच्या अंगावर दूध टाकल्यावर पाषाणाची मूर्ती थरथरत नव्हती साखर टाकल्यावर पण नाही एवढेच काय लोणी टाकल्यावर पण थरथर करीत नव्हती पण मध टाकल्यावर देव थरथर करीत होते मध तर गोड हाय स्वतः गावरान मध काढलेला आहे असली आहे सकाळी एकच थेंब डोळ्यात टाकल्यावर विस्तू लागण्यासारखं होतंय आग होती डोळ्यातील घाण बाहेर काढतंय मध जखमेवर टाकायची वस्तू नाही जखमेवर टाकलं तर जखम लवचिक होती भगवान शिव शंकराच्या डाव्या बाजूला एक वारकरी बसलेले होते त्याचं नाव संत शिरोमणी नामदेव राय महाराज….. पुजार्‍यांनी नामदेवरायांचा विचारले गेल्या चाळीस वर्षात देवाला आंघोळ घालताना कधी थरथर केली नाही पण मध टाकला की देव थरथर करतात काय भानगड आहे नामदेव महाराजांनी सगळे पुजारी बाहेर काढले आणि आतून दार लावलं आणि देवाला विचारलं पितांबर कशाने जळाला आहे सांगा लवकर विटेवरच्या मालकांनी खाली उडी टाकली रडू लागले काय विचारता नामदेवा… सांगा पितांबर कशानं जळाला हात दाखवा तुमचे मालक तोच विटेवरच्या मालकांनी पोळलेले हात दाखवले हाताला सोन्याच्या लगडा पोळलेल्या होत्या कशाने पोळलेल्या देवा एका श्रीमंत माणसाच्या सात किलो सोन्याच्या लगडी नरहरी कडे घडवायला आल्या होत्या उद्या दुपारपर्यंत त्या द्यायच्या होत्या नाही दिल्या तर पंधरा किलो सोन्याचा दंड लावला होता एखाद्या वारकर्‍याला एखादं गिराईक दटावत असेल तर मी करुणाघन कसला… करुणासिंधू कसला… करुणा वत्सल कसला…म्हणून त्या गिऱ्हाईकाची तृप्ती व्हावी म्हणून तर हे सोनं घडवले आणि गडबडीत पितांबर जळाला आपल्या भक्ताचं काम निस्तारण्यासाठी स्वतः सोनार नसताना सोनार बनून काम केलं…

       त्याचं काय झालं एकदा चोखामेळा त्याच्या पत्नीचं बाळंतपणाचे दिवस भरले होते कळा यायला लागल्या होत्या गावात सुईन नव्हती पांडुरंग गेले झोपडीचं दार वाजवलं सुखरूप बाळंतपण करतो म्हणून सांगितलं सासूनं फटीतून पाहिलं कोण तरी गडीमाणूस आहे दार उघडता येणार नाही तेव्हा भगवंतांनी त्या वेळेपुरती वेळ भागवण्यासाठी थोडावेळ साडी नेसून घरात प्रवेश केला व बाळंतपण केलं तसंच त्या पद्धतीने 2-4 भाऊ… थोरल्या भाऊ भावजईला जवळजवळ पंधरा वीस वर्ष लेकरू बाळ झालं नाही त्या काळात धाकट्या दिराला डॉक्टर करण्यासाठी थोरल्या भावानी ट्रक ट्रक हमाली करून खाली केल्या भावजईने चार घरची धुणी-भांडी केली व दिराला डॉक्टर केलं चांगला गायनोलॉजिस्ट झाला तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करून चार मजली दवाखाना थाटला इतक्यात भावाजईच नशीब फिरले देव पावला दिवस गेले हळूहळू दिवसामागून दिवस जाऊ लागले कळा यायला सुरुवात झाली डॉक्टरला निरोप दिला त्यांनी वहिनीला आणण्यासाठी गाडी पाठवली गाडीने वहिनी व आई दवाखान्यात आल्या पण नेमके त्याच दिवशी पगारवाढीसाठी दवाखान्यातल्या नर्सेस संपावर गेल्या होत्या नाईलाज झाला आईला म्हणाला एकही नर्स कामावर नाही वहिनीला नुसतं बघायला गेलो तर त्याही स्थितीत वहिनींनी डोक्यावर पदर ओढून घेतला बाहेर येऊन आईला म्हणाला वहिनी मला बघून लाजतात अशा अवस्थेत बरोबर नर्स नसताना वाहिनीच्या अंगाला हात लावू शकत नाही तेव्हा आई म्हणाली तू एक कर तूच तुझ्या वहिनी साठी पांढरी साडी नेसून नर्स बन आणि बाळंतपण कर अशा प्रकारे हा एवढा मोठा डॉक्टर पण वहिनी साठी पाच दहा मिनिटे पांढरी साडी नेसून नर्स झाला व सुखरूप बाळंतपण केल

                एक होतं तलाठी ती गेलं पंढरपूरला वारीला इकडे गावात एका च्या पोरीचं लग्न जमलं…लग्न आता हौसेन करायचं ठरलं बाप म्हणाला एखादा एकर विकीन लग्न थाटातच करीन कारण सोनं करायचं… आचाऱ्याला पैसे द्यायचेत…मांडव करायचा आहे… सामान-सुमान सगळं काही करायचे बाकी होतं आता शेत इकायचं म्हणल्यावर गावातल्या तलाठ्याची सातबारा उताऱ्यावर सही लागतीया तवा व्यवहार होतोय पण तलाठी गावात नाही पंढरपूरला वारीला गेला पोरीच्या बापाने त्याला फोन करून असं काम सांगितलं सातबारावर तुमची सही झाल्याशिवाय बाकीचा व्यवहार व्हायचा नाही होणार नाही असं सांगितल्यावर तलाठी म्हणला दोन-चार दिवस लागतील आणि वारीत आहे पांडुरंगाने हळूच त्याच्या कानात सांगितलं वारी सोडून तू गावाकडे जा त्या बिचार्‍या पोरीचं लग्न जुळले आहे अशी तू जर वारी केली तर तुला पुण्य लागणार नाही पण तू गेला तर याच्या शेतीचा व्यवहार होईल त्या पोरीच्या गालावरचं हसू तुला दहा वाऱ्या केल्याचं पुण्य भेटेल असा देवाचा महिमा असतोय

                  एक जोडप भलतंच नास्तिक होतं एवढेच काय मंदिरासमोरून जाताना देवाकडे तोंड सुद्धा करत नव्हतं पण दोस्त चांगले भेटले दोस्ताच्या संगतीण महाराज काशीला गेलं भगवान विश्वनाथाचे दर्शन घेतलं नंतर ज्यावेळी पती-पत्नी मार्केटमध्ये फिरत असताना एका झाडाखाली एक कपड्याचे दुकान होतं दुकानदाराने बुक्का लावलेला हातात एक तारी व चिपळ्या होत्या आत्तापर्यंत एकतारीवर काही विशिष्ट लोकांनीचं भजन केले एका बाईने तर एक तारी भजन करून त्या जगाच्या मालकाला आपलंसं केलं तिचं नाव आहे भक्त मीराबाई त्या कापडवाल्याचं डोळे झाकून भजन चालू होतं कारण ती जोडपं दुकानापाशी जाऊन व दुकानदार अहो दुकानदारअसं विचारलं काय पाहिजे…त्यांनी सांगितलं कपडे पाहिजे दुकानदारांनी कपडे दाखवून किंमत सांगितली त्यांनी सांगितल्यापेक्षा अर्धीच किंमत दिली ते कपड्याचे दुकानदार म्हणजे संत कबीरदास….. काही म्हणाले नाही कबीरांनी अख्ख जीवन देवावर सोपवून दिलं होतं यात्रा आटपली घरी आले हे महाराष्ट्रातले कुटुंब होतं परत आल्यावर रोहिणी नक्षत्र सुरू झालं ढगांचा कडकडाट विजेचा लखलखाट सोसाट्याचा वारा… रात्रीचे एक वाजले होते बाहेर झोपलेली सगळी माणसं थंडीत गारठली होती आपापलीअंथरून घेऊन घरात पळाली दोन-अडीच तास धो-धो पाऊस पडला पाऊस थांबला वादळ शांत झालं पण बाहेर चिखल झाला होता ही जोडपं साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षे वयाचं होतं मध्यरात्री ही जोडपं निवांत शांत बसलं होतं एकदा का उतारवय झालं की माणसाला काही गोष्टी वाढतात तर काही गोष्टी कमी होतात म्हातारपण झालं की झोप कमी होती रात्री 12 नंतर खोकला सुरू होतोय भूक कमी होती हाव वाढती ही जागीच होती पण बाईनं नवऱ्याला विचारलं मालक आपल्या घरात भजन कोण करतयं नवरा म्हणाला मला पण दहा पंधरा मिनिटांपासून विचारायचं होतं ते आपल्या घरात राम नामाच भजन कोण करतयं म्हणून ती म्हणाली गेल्या पस्तीस पिढ्या माझ्या माहेरात कोणी माळ घातली नाही कोणी टाळ वाजवला नाही इतक हलकट होतं यांनं सांगितले माझ्या 45 पिढ्या गेल्यात आम्ही काय तसल्या फंद्यात नाही कुणा माळकऱ्याला घरी येऊ दिलं नाही कोणाला बोलावलं नाही कुणी माळ घातली नाही कोणी सप्त्याला गेलं नाही कुणी भजन केलं नाही कधी देवाचं नाव घेतलं नाही बायको म्हणाली माझ्या 35 पिढ्या आणि तुमच्या 40 पिढ्या अशाच गेल्या देवधर्म नाही मग आपल्या घरात भजन कोण करतंय शहानिशा झाली काशी इथून कबीर यांच्या दुकानातून घेतलेले कपडे राम नामाचा भजन करीत होती तिथून घेतले गेलेले कपडे भजन करीत होते त्यातला शेला भजन करीत होता बायको म्हणाली हा भजन करणारा शेला आपल्या घरात ठेवू नका कारण याचं भजन बघून आपली पोरं पण भजन करतील ते करतील आणि आपल्या पैशाची धुळधान करतील म्हणूनं हा शेला ठेवू नका ही पण एवढं हलकट होतं त्यांनी त्यो शेला घेतला आणि पंढरपुरातल्या एका श्रीमंत माणसाला दिला विकून टाकला त्याला भजन करतोय म्हणून पती-पत्नीनं घरी ठेवला नाही आणि श्रीमंत पण एवढया हलकट चालीचं होतं त्यानं पायपुसणं म्हणून 35 वर्षे वापरले 36 व्या वर्षी नामदेवरायांची आई गोणाबाई आणि दास्यत्व ज्यांनी केलयं त्या जनाबाई ह्या दोघी श्रीमंत घरची सर्व कामे करायला म्हणून या दोघी गेल्या त्या सगळे कपडे घेऊन वाळवंटाला कपडे धुण्यासाठी गेलेल्या कपडे वाळलेले होतें खाल्ल्यामुळे डोळ्यावर झोपेची तार आलेली होती त्यातली काही कापडं दोघींनी पण उशाला घेतली जनाबाईला झोप लागल्यावर कानात राम नामाचा ध्वनि घुमला जनाबाई झटकन जाग्या झाल्या आणि या कापड्यातून रामनामाचा ध्वनी येतोय म्हणाली असं कसं शक्य कानाला लावताचं त्यातून रामनामाचा ध्वनी ऐकू आला बाई म्हणाल्या जनाबाई चटकन या माणसाकडे जा आपण चार-पाच दिवस झालं काम करतोय सर्व काम करून सगळं कसं चकाचक केलयं त्याला म्हणावं मोबदला काही नको मोबदला म्हणून तुमचं काय पैसा पाणी नको फक्त एवढा फाटका कपडा द्या बाई म्हणाल्या बाई मोठ्या घरची होती 35 किलो ज्वारी गाठोडे बांधून जना आल्यावर ती जनाला म्हणाली ही गाठोडे घेऊन जा जनाबाईने ती गाठोड घेतलं आणि जरा दमानं चालत होत्या बाईच्या लक्षात आलं त्या म्हणाल्या आपण दिलेले धान्य यांना पुरेसे वाटत नाही त्यांनी आवाज दिला जना sss इकडे ये अजून ज्वारी देऊ का जनाबाईचें डोळे टचकन् पाण्याने भरून आले पाण्याच्या धारा लागल्या म्हणाली ही पण परत घेतले तरी चालेल पण त्या गाठोड्यातील गुलाबी कपड्याचा शेला इकडे टाका ही बाई म्हणाली अग जना नेसायला लुगड मागितलं असतं तर नवं दिलं असतं तुमच्या घरी धोतराची कमी असती अन मागितलं असतं तर ती सुद्धा नवं दिलं असतं पांघरायला कमी असतं एखादी चादर वगैरे दिली असती तर मागून मागून काय मागितलं तर पाय पुसायचं फडकं मागितलं जनाबाई म्हणाल्या की काही असू द्या पण ती फडकं तेवढं द्या घरीं गेली आणि हृदयाला लावलं ती पुन्हा नदीवर गेली वाळवंटात तिने कापड धुतलं घरी गेली घरी गेल्या गेल्या दामू शेट्टीने हाक मारली बाबा कारण मुलगी नसताना त्यांनी मुलीसारखं प्रेम लावलं त्याला ती बाबा म्हणाली फडक्याच्या धाग्या धाग्यात रामनामाचा ध्वनी येतोय मग जना आपल्याकडे रात्री अकरा-साडेअकरा वाजता जगाचा बाप येतोय मला दळू लागतोय किती दिवस झाले तो खाली बसतोय त्याला दळायला आल्यावर बसायला टाकायला आपल्याकडे काही नाही आता उद्यापासून ज्या ज्या वेळी आपल्याकडे येईल त्या त्या वेळी त्याला बसायला टाकायचा देवाला शेला टाकल्याबरोबर देव त्या शेल्या कडे बघतात जनाबाईने विचारलं देवा हा शेला कोणी विनला ते म्हणाल मला काय माहित आता ह्याला माहित नव्हतं व्हयं देवच होता पण सांगितलं नाही कालांतरानं 2-4 आचार्य शास्त्री पंडित जगातल्या कुठल्याही शास्त्राचा एकही शब्द अनुत्तरीत ठेवायचा नाही त्याला पंडित म्हणतात संप्रदायामध्ये एखाद्याच्या पायाला हात लावून पाया पडायचं असा संकेत आहे एकदा विठ्ठलाच्या जवळ असताना जनाबाई कबीरांच्या पायाला हात लावून पाया पडल्या पण त्या कबिराला पाया पडू देईनात त्या म्हणाल्या तुम्ही अधिकारी आहात म्हणून पडली कबीर म्हणाले मातोश्री तुमच्या गवरीला जरा हात लावला तर विठ्ठल विठ्ठल बोलती मग जनाबाईने सांगितले गवरी पाण्यात टाकल्यावर विरघळते इथपर्यंतच माझी भक्ती आहे पण तुम्ही पस्तीस वर्षापूर्वी विणलेला शेला दर आठवड्याला दोनदा धुतला आहे त्याला छिद्रे पडली कडा कोपरे फाटलीत पण अजून सुद्धा त्याच्यातून राम नामाचा घोष ऐकू येतोय तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात त्याच्यातले राम नाम धूऊन गेले नाही हा शेला जर इतका अधिकारी असेल तर हा शेला विणणारा वारकरी किती मोठा अधिकारी असेल

*************************************

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here