करमाळा

‘श्रीकमलादेवी पायथा ते खंडोबा मंदिर’ या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करा; मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सूचना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘श्रीकमलादेवी पायथा ते खंडोबा मंदिर’ या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करा; मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सूचना

करमळा(अभय माने ); देवीचा माळ पायथा ते चढावरील खंडोबा मंदिर यादरम्यानच्या जवळपास 400 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्विस रस्ता करावा ही सर्व भक्तांची मागणी होती या कंपनीच्या ठेकेदारांनी सुद्धा या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सर्विस रोड करून देण्याचा शब्द दिला होता

त्र काही ठराविक लोकांनी या रस्त्याला विरोध केल्यामुळे भक्तांचे अपघातामुळे जीवनमान धोक्यात आले होते. यावर प्रचंड वाद झाला होता.

आमदार संजय मामा शिंदे यांनी सुद्धा या रस्त्यासाठी मार्ग काढण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेतली होती.

आज माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे निवासस्थानी सर्व करमाळा देवी भक्त, देवीचा माळ ग्रामपंचायत सदस्य व नागरिक व कमलादेवी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थित बैठक घेण्यात आली.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. नवरात्र काळात तर दररोज किमान दोन ते तीन लाख लोक कमला देवीच्या दर्शनासाठी येतात शिवाय या रस्त्याच्या चौकातून सात ते आठ साखर कारखान्याची ऊस वाहतूक केली जाते या ठिकाणी तीन चौक तीन रस्ते एकत्र येतात व एकदम न्यूटन घेऊन वळतात यामुळे सातत्याने अपघात होतात या रस्त्याला प्रचंड तीव्र उतार आहे या सर्व बाबींमुळे या क्षेत्राला सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

त्यामुळे भावी काळातील मोठे मोठे अपघात टाळून जीवित हानी टाळण्यासाठी या मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15 फुटाचा सर्व्हिस रस्ता होणे गरजेचे आहे

जयवंतराव जगताप यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे हा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपस्थित पदाधिकाऱ्यासमवेत जयवंतराव जगताप यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना फोन लावून या रस्त्याचे महत्त्व पटवून देऊन यातील अडथळा दूर करण्याच्या विनंती केली.

यानंतर बांधकाम खात्याचे अभियंता वामन उबाळे यांना फोन करून या रस्त्याच्या आड येणारी अतिक्रमणे पोलीस बंदोबस्त लावून काढावा.

कमला भवानी भक्तांच्या जीविताचे महत्व असून ठराविक लोकांच्या विरोधासाठी हा रस्ता काढून ठेवणे योग्य नसल्याचे मत सुद्धा सर्व उपस्थित लोकांनी व्यक्त केले.

यावेळी या कामाचे ठेकेदार भरत अवताडे यांनी सुद्धा अतिक्रमणाचा अडथळा दूर केला तर दोन्ही बाजूने 15 फुटाचा रस्ता करून देऊ असा शब्द आमदार जयवंतराव जगताप यांना दिला.

या बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे देवीचा माळ सरपंच महेश सोरटे कमला भवानी देवी ट्रस्ट सचिव अनिल पाटील देवीचा माळ येथील प्रमुख पुजारी दादासाहेब पुजारी विजय चव्हाण थोरबोले शिंदे चव्हाण फुल फुले पवार आधी सहज शेकडो भक्तगण उपस्थित होते.

litsbros

Comment here