… लेखणीला लागलं…लेखाचं डोहाळं …
……….. ………..
मुळातच लेखणीचा जन्म झालाय तो अशा कितीतरी लेख…काव्य… चरित्र लेखन… ग्रंथ लेखन…कार्यालयातील नोंदी …यासाठीच…
कारण आतापर्यंतचा इतिहास सांगतोय की स्त्री ही माता आहे आणि तिचं पूर्ण आयुष्य ती खरोखरच चंदनासारखं झिजवते मग या अंतर्गत प्राणी…पक्षी… आणि जलचर…सर्व सजीवांना आपण त्याच दृष्टिकोनातून पाहिलं तर तंतोतंत एखाद्या साच्यात फिट्ट बसावी अशी एक संकल्पना आहे तर आपण लेखणीला सुद्धा याचंच स्वरूप दिलेलं आहे कारण लेखणी सुद्धा आपल्या प्रत्येक कलाकृतीला जोपासण्याचं आणि संबंधित लिखाणाचं सामर्थ्य… बळ वाढवून संगोपन केल्यासारखं एका विशिष्ट उंचीवर नेण्याचं काम करते तसं बघायला गेलं तर एखाद्या धारदार शस्त्रापेक्षाही लेखणीची धार एखाद्या दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर एक प्रबोधन केल्यासारखी करते आणि त्या दुष्ट विचाराचे रूपांतर एका सज्जनाच्या पंक्तीत नेऊन बसवते आणि ही लेखणी सुद्धा एखाद्या मातेप्रमाणे वंश वाढवते हेतू असा की लेखणीपासून हजारो लाखो लिखाणं मूर्त स्वरूपात यावीत यासाठी पहिली प्रक्रिया म्हणजे डोहाळे तर लेखणीला सुद्धा डोहाळे हे एखाद्या लेखाचेच लागलेले असतात आणि ते डोहाळे पुरवल्याशिवाय लेखणीला समाधान मिळत नाही आणि त्यातूनच जन्म घेत असतं ते एक अप्रतिम लेखन…नाट्य…काव्यसंग्रह… ग्रंथ…चरित्र… आणि इतिहास…
अन मुख्य म्हणजे वास्तव आणि या लेखणीचं काय सांगावं तवा तिचं कर्तव्य आणि कार्य सुरू होतं असतं ते कसं तर इथपर्यंत कोणी विचार केलेला नसतोय ज्यावेळी मनातल्या अंतरंगामध्ये दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ओठ हे एक माध्यम असतं आणि काहीतरी कारणास्तव किंवा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या भावनांना मातीत गाडावं लागतं हां अजून एक पर्याय आहे त्या भावनांना गुंजारव करून एकत्र करायचं मायेच्या उबदार स्पर्शाने कुरवळायचं सुपात घेऊन माणुसकीने चांगलं घोळवायचं आणि घरासमोरच्या अंगणात पसरायचं आणि त्या मनाच्या अंगणात पडलेल्या शब्दांना तर्जनीच्या बोटांनी चंदनाचा लेप द्यायचा त्यावेळी मन कसं एकाग्र कराव लागत की वाऱ्यालाही चाहूल लागू देऊ नये आणि मग त्या सुगंधित शब्दांना पांढऱ्या शुभ्र कागदाच्या स्वाधीन करावं लागतं आणि मग तेव्हा कुठं एखाद्या लेखाचा… कवितेचा…नाटकाचा… आणि एका साहित्याच्या ठेव्याचा…जन्म होतो हे अजून कुठे कुणाला माहितीयं
तसं बघितलं तर माझ्या लेखणीने वर्षानुवर्ष लिखाण केल्यानंतर प्रथमच माझ्याजवळ तोंड उघडलं माझं स्वप्न मी लिहिलेल्या लेखनापेक्षा पण रंजक आहे तुमच्या हातातलं पेन हे माझं आधुनिक रूप आहे त्याच्या विकासाचा एक स्वतंत्र इतिहास आहे खरं बघायला गेलं तर आत्तापर्यंतचे काही विषय हे मी त्याच्या जन्मापासून म्हणजे निर्मितीपासून मांडत आलोय तसं बघितलं तर माझ्या लेखणीचा जन्म लिहिण्याच्या एका इच्छेतून झालाय खरंय ना आपल्या भावना कल्पना विचार नुसते बोलण्याने कोणत्याही माणसाला त्याचं पुरेपूर समाधान मिळत नाही.
माणसांनी भाषेची एक लिपी आपल्या सोयीनुसार तयार केली त्यासाठी त्यांनी प्रथम कागदाची निर्मिती करून सामग्री तयार केली आपल्या पूर्वजांनी जंगलातील वाळलेल्या पानावर रक्तचंदन कुरुंदाच्या दगडावर घासून निघणारा लालसर द्रव आणि त्यांनी मजकूर लिहून संदेश इतरत्र पाठवला असा हा प्रारंभाचा इतिहास पण तो कागद लिहायचा कसा त्याच्या मेंदूत झटकन एक कल्पना जन्माला आली त्यांनी बांबूची पातळ फांदी तोडली आणि चाकूने त्याला टोकदार बनवले माणसाने मस्करा या लाकडी कोळशाला एका कुरुंदाच्या दगडावर घासून त्यापासून शाई केली त्यांनी ती टोकदार लेखणी त्या शाईमध्ये बुडवून लिहायला सुरुवात केली
आणि या फांदीच्या रूपामध्ये या जगात माझ्या लेखणीचा जन्म झाला आणि लिखाणाचं एक साधन असल्यामुळे त्याचं नाव लेखणी असे पडलं …गेली कित्येक वर्ष माझ्या या लेखणीचं कार्य अविरतपणे चालू आहे हे बघा आकाराने लहान आणि अंगाने शिडशिडीत असा बांधा असला तरी शस्त्रापेक्षा तीक्ष्ण धार माझ्या जिव्हारी शब्दापेक्षा कमी पडतीये लेखणी एका महान क्रांतीच्या मागं जात आहे तिचा उद्देश नेहमीच ज्ञान… विज्ञान…. यांचं भांडार करणे हाच आहे याचं लेखणीने कित्येक धर्मग्रंथ घरोघरी पोहोचवून देवघरात स्वतःचे एक स्थान निर्माण केलंय लेखणी ही तिचं वय कधीच मोजत नाही का ध्यानात ठेवत नाही ती कायम सरस्वतीच्या सेवेत दिसते ही लेखणी रूपाने देखणी जरी नसली तरी एकदा का तोंड उघडलं की भल्याभल्यांची बोलती बंद करते परखडपणा रोखठोकपणा हा तिच्या अंगाअंगात भिनलेला तिने तिचा संसार प्रपंच थाटलेला नसताना जो कर्तुत्वाने वागतो त्याची मान समाजामध्ये नेहमी उंच ठेवली युग कोणतंही असलं तरी प्रखरतेमुळे ही लेखणी भीतीने कधीही माघार न घेता कार्य चालू ठेवते की ती कथा…कादंबऱ्या..ललित लेख.. लिहिले तरी ती कधीही थकलेली दिसत नाही लिहिताना एखाद्या वेळेस आपली बोटं घामेजून जातील पण लेखणीला कधी घाम येत नाही थकवा जाणवत नाही ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत लेखणीचा हात धरला मग परिस्थिती कितीही अनुकूल… प्रतिकूल… किंवा आणीबाणीची…आली तरीही साथ संगत न सोडता कायम त्याला साथ दिली सुख दुःख कधी लिहिलं किंवा जीवन चरित्र… प्रवास वर्णन… लिहिलं तरी काम पाहून तिची ख्याती सर्वत्र पसरते ज्ञानाचा एक प्रचंड साठा या विश्वात अजूनही टिकून आहे तो लेखणीचा चमत्कार आहे
या लेखणीने महर्षी व्यास… वाल्मीक ऋषी…. कालिदास…भवभूती…टॉलस्टॉय… शेक्सपियर…यांना अजरामर बनवलं आहे.
रामायण…महाभारत…शाकुंतल…हॅम्लेट… गीतांजली…इत्यादी याच लेखणीमुळे उदयाला आले ज्ञानाचा दिवा लावून सारं जग प्रकाशमय केलं माझ्या लेखणीने… लेखणीमधूनच अक्षराच्या ठिणग्या आणि ज्वलंत विचार एक वेळ बाहेर पडतात एक वेळ आमच्या स्वातंत्र्य चळवळीची आई लेखणी होती तसं बघितलं तर तलवार आणि लेखणी दोन्ही देशासाठी आवश्यकच फक्त युद्धामध्ये तलवार माणसाला निरंकुश बनवते ती मानवी शरीराला स्पर्श करते आत्म्याला नाही पण लेखणी आत्म्याला स्पर्श करते लिहिताना हृदयाला हात घालते पण हृदयाला साधा धक्का सुद्धा लागू देत नाही आता आपण तिची पार्श्वभूमी याबद्दल विचार करू रेषा किंवा शब्द व चित्र मूर्त स्वरूपात उतरवणारे साधन व प्रतिमा चिन्ह यांची हुबेहूब नोंद ठेवून ही कला माणसाला माहीत होती पण लेखन करण्यासाठी पृष्ठभाग उपलब्ध होईपर्यंत लेखणीचे पूर्ण रूप अस्तित्वात नव्हतं.
आई, वडील रोजंदारी वर कामाला, केमच्या श्रावणीने ९६ टक्के गुण मिळवत गाठले यशाचे शिखर
खूप वर्षांपूर्वी कुंचला त्याला आपण ब्रश म्हणतो बहुतेक करून लेखणीची ही पहिली अवस्था साधारण करंगळी एवढ्या जाडीची लाकडाची फांदी घेऊन त्याचं एक टोक दगडाने ठेचून तंतुमय करायचं आणि त्याचा वापर करायचा या प्रगतीची उत्तरोत्तर क्रांती होत गेली. नदी किनारी असणारी ठराविक वनस्पती त्यापासून बोरु तयार केला गेला अक्षराला वळण मिळालं बाळबोध सारख्या लिपी जन्माला आल्या एका महत्त्वाच्या वळणावर त्याचं सोनं झालं मराठी हिंदी व संस्कृत भाषेतील धर्मग्रंथांमध्ये हीच लिपी वापरू लागले पक्षांच्या पिसापासून बनवलेली लेखणी त्याही पूर्वी वापरत होते काही काळ लेखण्या वापरल्या गेल्या धातूची निब आली ती लाकडाला टोचून लिहीण्यासाठी प्रचारात आली नंतर वरील साधनाचा कोणी वापर करेनासं झालं या वस्तू लोप पावत गेल्या नंतर बॉलपेन… फाउंटन पेन… ही लेखणीची आधुनिक प्रकारं उदयास आली
*****************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Add Comment