आम्ही साहित्यिक

🤣🤣🤣 इरसाल गाव 🤣🤣🤣

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🤣🤣🤣 इरसाल गाव 🤣🤣🤣

                 ***************

       आता गावं तशी भरपूर असतात कारण आपला महाराष्ट्र शेतीप्रधान म्हणजे जिथे शेती करायची तिथे आसपास लोक वस्ती उंबऱ्याला उंबरा लागतो निर्माण होतं एक ठुमदार गाव मग त्या प्रत्येक गावाची रचना खरंच एक वेगळ्या प्रकारचे असती आणि एक विशेष आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दर 50 ते 100 किलोमीटर वर संस्कृतीमध्ये थोडा फरक जाणवतो मग तो थोडा असल नाहीतर जास्त असेल आता बघा आपण पुण्यामध्ये जे बोलतो किंवा खातो म्हणजे खाद्य संस्कृती

       अन साधारण 150 ते 200 किलोमीटरवर असणाऱ्या सोलापूरची बोलीभाषा खाद्य संस्कृतीमध्ये खूप तफावत आढळते इथं पुण्यात म्हणजे तोंडानी गोड आणि हातानी जड म्हणजेच सगळेच पुणेकर काय असं वागतात असं नाही पण ज्याला ज्याचा अनुभव आला तो नमूद करू पाहतो खरंतर पुणेकर म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं ह्याला इतिहास साक्षीदार आहे पाव्हणा जेवायला आल्यावर खूप सावध वागणार आपला ग्रामीण भाग 50 माणसं येऊ द्या 50 माणसांचा स्वयंपाक अर्ध्या तासात तयार भलं पिठलं भाकरी पण दणकून आता पुण्यातला अनुभव सांगतो पहिलं मी कवा तरी बाहेरगावी राहायचं नातलगा कडे किंवा आप्तस्वकीयांकडे कधीतरी येणं जाणं व्हायचं 14 वेळा झाल्या नुसतं म्हणायचे आत्ता एव्हढी बार जाऊ द्या पण पुढच्या वेळेस नक्की जेवायला यायचं हं चांगल्या तासभर गप्पा मारल्यावर निघताना पायामध्ये चपल्या घातल्यावर म्हणणार थोडासा चहा घेतला असता तर आरं चहा ठिवायचा तर मग मगाशीचं ठिवायचा ना आता

 निघताना असतयं व्हयं असली तर एक एक जण शहाणी असत्यात तर त्याला काय सांगायचं तिच सोलापूरकर मंडळी अंबाडीची भाजी…पातळ भाकरी… शेंगदाण्याची चटणी..पण खाकी बे ss असं उग्र भाषेत बोलून बळं बळं जेवू घालणार त्याला म्हणायचं खरं प्रेम असो प्रत्येक ठिकाणी संस्कृती वेगळी असते अन माणसाची मनस्थिती पण कोणाची मनं मोठी असतात कोणाची संकुचित असतात पण काही कारणापरत्वे मला नाशिक जिल्ह्यात नवी वाडी या गावाचं नावच असं अर्धवट आणि विचित्र आहे.

        तिथं मे महिन्याच्या सुट्टीत चांगलं आठ दहा दिवस राहण्याचा योग आला गाव तसं बघायला गेलं तर धड खेडं नाही आणि धड शहर पण नाही तर त्या काळात गावामध्ये बहुतेकांची घरं माळवदाची काँक्रीटचं क्वचित एखादं गावाची दिमाखदार ती दगडी वेस लाईटीने अजून गावात तोंड दाखवलेलं नव्हतं अख्या गावात बारीक बारीक बोळ वजा आणि आडव्या उभ्या चाळी गावाने अजून पण चाळ संस्कृती जपलेली होती पूर्वेला ग्रामदैवत भैरवनाथ…पश्चिमेला मारुती… दक्षिणेला लक्ष्मी आई…आणि उत्तरेला जागृत रामेश्वराचं देवस्थान…आसपास सगळ्या वाणाची माणसं राहायची सगळ्या जमातीची माणसं गुण्या गोविंदानी राहायची गाव कसं कागदाच्या नाही पण मनाच्या नाकाशावर उठून दिसायचं माणसं परिस्थितीने बघितली तर गरीबच होती पण मनाने श्रीमंत नाही तर कुबेर होती शिवाय नोकरी निमित्ताने आलेली पुणेरी…सातारी… कोल्हापुरी…सगळ्याच जिल्ह्यातील म्हणा ना खरं तर ही देव माणसं वाटायची गावकीच्या राजकारणात त्यांचं अजिबात लक्ष नसायचं आपला शिक्षकी पेशा…बँकेतली नोकरी… बंडिंगच्या खात्यात…नाहीतर इरिगेशनचे पाटकरी… त्या विधात्याने एक वेगळ्याचं धाटणीची मूस वापरून ही अशी नामांकित माणसं तयार केलेली असावी त्यांची जडणघडण जगा वेगळी

        या माणसांमध्ये लसणाचा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा…मटकीची उसळ…सपक सांबार किंवा झणझणीत तर्रीचं कालवण… कडसर बाजरीच्या किंवा गोड ज्वारीच्या भाकरी… वेशीजवळ तिखट शेवपुरी…पाणीपुरी…नाहीतर वडापाव…लज्जतदार मिठाई…सारखी सगळेच गुण माणसात दिसून यायचे अरे कारे एकेरीपणाची बोली आणि डोळे वटारून उग्र वाटणारे आणि थोरा मोठ्यांची इज्जत करणारे… हळव्या मनाचे…आपुलकी प्रकट करणारे गुण… देखील ठासून भरलेले माणूस हा जन्मता असाच असतो असं नाही तर त्याला इथल्या मातीत वेडावणारे आणि जीव लावणारे कडू गोड संस्कार एकत्रित रित्या मिळालेले असतात गावात एक जुनी चाळ होती ती भटाची चाळ म्हणून प्रख्यात होती तिच्या आजूबाजूला किंवा मागे पुढे तसा पोस्टाचा पत्ता असायचा ती चाळ चांगली ओळींनी बांधलेली पत्र्याची 15 X 10 ची जवळ जवळ 16 घरं होती कॉमन दोन संडासं होती दोन घरात एक असा अंगणात नळ होता सगळ्या घरात रॉकेलची चिमणी नाहीतर कंदील काही तरी अशिक्षित लोकांचे बुद्धी वैभव इथं नांदत होतं संसार गाड्याखाली दबलेल्या पोरांची खेळणी खराट्याच्या काड्याचं धनुष्य त्याच खराट्याच्या काडीचा बाण कधीच कोणाचा नेम कुठं लागला नाही आणि ही नुसती आपली मनाची खोटी समजूत काड्यांचे बाण बनियनच्या भात्यात लटकवत दाटीमुटीची लढाई बघायला प्रत्यक्ष राम कृष्ण जरी अवतरले असते तर त्यांनी देखील यांना नमन केल्याशिवाय राहिलं नसतं आता एक आणखी चाळ महंमद भाईची चाळ जवळजवळ कमीत कमी दोन-चार पिढ्यातील बिऱ्हाडं तिथं राहत असावी या चाळीचे तापमान अन्य चाळीपेक्षा वेगळं असायचं कारण काही अंतरावर पलीकडे हिरवागार शेतीचा पट्टा… पाण्याचा वाहता पाट… सगळी हिरवाई…त्यामुळे दुडु दुडु धावत येणारा वारा अंगणातल्या पाण्याच्या माठाला गारेगार करायचा त्यामुळे तिथली माणसं शांत आणि संयमी स्वभावाची चाळीच्या बाहेर एका भैय्याचं दूध माव्याचं हॉटेल मस्तीला उधान यायचं दुसरी एक एका बाजूला चाळ होती त्याला नाव नव्हतं पण पुणे…सातारा जिल्ह्यातली पिवर मराठी पगडा असलेली माणसं सकाळी प्रत्येकाच्या दारापुढे रांगोळी संध्याकाळी तुळशीपुढं दिवा सारं काही संस्कारी जीवन शांतता तर एवढी की साधी खुसखुस पण दुसऱ्या बिऱ्हाडात ऐकायला जायची की भिंतीला पण कान असतात ही म्हण चुकीची वाटायची कारण भिंतीला तोंड पण असतं असा संशय यायचा आता सुतारनेट म्हणून एक गल्ली होती बहुतेक सुतार काम करणारी कुटुंबे तिथे राहायची म्हणून त्याला सुतारनेट ही सुतारांची गल्ली इतक्या टिपक्याच्या रांगोळी सारखी संस्कृती दर्शन घडवणारी घर कधीकाळी या ठिकाणी भाजी अन फुलांचा मळा होता बागेतील फुला फळांना हवं नको ते पाहिलं जायचं त्यांना फुलवावं असा प्रयत्न करताना मैत्रीच्या नात्यात गोडवा निर्माण करायचा आई-वडिलांनी भावा-बहिणींनी लाड करावेत अशी चाळ जुनं ते सोनं ही खरं असलं तरी सरसकट जुन्याला कवटाळून न बसता थोडं आधुनिकतेकडे वाटचाल करणारी नवी पिढी अन माणसं 

        आता बघा बैठी घरं असली तरी त्याला काहीजण चाळच म्हणायचे एका घरात दिलेली फोडणी 10 घरं पार करून ठसका उठवून गोंगावत जाणारा सुवास चहुदिशा नाकात अतिक्रमण करीत जातो इथली सगळीच माणसं बहुगुणी व बहुमोली आणि कलावंत पण आहेत गावोगावी वडाच्या झाडाखाली गॅस बत्तीच्या उजेडात तमाशाचा फड चालवणाऱ्या कलाकाराचं आश्रय स्थान असलेली कलेची कदर करणारे आणि राजकारणी पण गावात आहेत राजकीय विश्लेषक आहेत गावात कृष्ण पण आहेत आणि सुदामा पण आहेत डोक्यावर पिकलेले केस असो वा कमरेत वाकलेला गडी असो पण अखेर पर्यंत ताठ कण्याने जगत असतो ती माणसं म्हणजे लहानपणापासून मोठेपणापर्यंत तशीच असतात म्हणजे फक्त त्यांच्या गुणात वाढ झालेली असते अनुभवाचं ओझं घेऊन वावरत असतात पाहुण्या रावळ्यांचा आब राखतात म्हणून घरात राबता असतो झाडावरची पानं मोजण्यासारखं अवघड काम लेखक नेहमी उडत्या पाखरांच्या पिसाची उदाहरणं देतात पण झाडावरची पानं इथल्या लोकांचा आवडीचा विषय इथे एखाद्या वेळेला घराबाहेर तुळशी वृंदावन दिसणार नाहीत पण असते ती कुंडी त्यात पाणी घालून प्रेम करणारी माणसं व खरं भोळसट असतील पण व्यवहार चातुर्यात बाप असतात

        आता बघा इथली माणसं म्हणजे मला जरा वेगळीच वाटायची प्रत्येकाचं असा एक विश्वास असायचं म्हणजे धार्मिक पण नव्हती आणि मूर्ती भंजक पण नव्हती कोणाकडे एखादी पोथी वाचली जायची…तर कोणाकडे नवनाथ भक्तिसार…कोणाकडे खंडोबाची तळी भरली जायची…तर कोणाकडे स्वाध्याय चालायचा… कोणी धर्माधिकारी समर्थांच्या बैठकांच्या आधीन इथली तरुण मंडळी तर रस्त्याचा वापर विमानतळाच्या धावपट्टी सारखा करताना दिसून यायची कुणाला चुकून धक्का लागला तर सौजन्याची मूर्ती दिसून यायची हल्ली हे बरं दिसतयं बाया दुचाकीचा वापर करू लागल्यात भाजी खरेदी किंवा मुलांना शाळेत सोडायचं असो किंबहुना बऱ्याच पुरुषी कामांचा भार उचललेला दिसतोय पण त्याच्यामुळे चपलांच्या दुकानांना तेजी आल्यासारखं वाटतंय एक काळ असा होता बुवाच्या हॉटेलवरून उसळ खाल्ल्याशिवाय दिवस सुरू होत नव्हता दूध फापडा आणि जिलेबी गावातल्या लोकांना लई भारी आवडायची खाल्लं नाही तर काही तरी चुकल्यासारखं वाटायचं पोत्याच्या पालाचं हलवायाचं दुकान आत जिलेबी आणि भज्याची कायम भट्टी चाललेली आतच साखरेची दोन-चार बारदानं अंथरलेली पहिलं आत बसून भेळभत्ता आणि जिलेबी नाही तर भजी चापायची आणि हा तवा त्या मानाने स्वस्ताई होती म्हणायची

        साबुदाणा वडा… बटाटा वडा खायला सडकेवर जावं लागायचं आता सडक म्हणजे लोक वस्ती पासून फर्लांगभर लांब येणारा जाणारा हम रस्ता एस टी तिथेच थांबायची एस टी चा थांबा एखादीच एस टी चौकापर्यंत म्हणजे पंचायतीच्या ऑफिसपर्यंत यायची तर त्या रस्त्याला बस थांब्याला सडक म्हणायचे बटाटे वड्याची चटणी खाण्यासाठी जीव गुंतायचा फायद्यासाठी धंदा केला नाही आपल्या माणसांना जपणारी पिढी पाहिली 

*************************************

 किरण बेंद्रे

 पुणे

7218439002

litsbros

Comment here