करमाळा

चिखलठाण नंबर 1 येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास विषयी प्रशिक्षण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिखलठाण नंबर 1 येथे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास विषयी प्रशिक्षण

 केत्तूर (अभय माने): करमाळा तालुक्यातील चिखलठाण नंबर 1 येथे कुशल ओपन कॉमर्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्रीकृष्ण जगताप यांनी केले होते. यावेळी कृशल ओपन कॉमर्स टीम लीडर अच्युत गोळे व मुरघास तज्ञ श्रीमंत झाकणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी श्रीकांत बळीराम सरडे कुगाव यांच्या गाई दगावल्यामुळे कृशल ओपन कॉमर्स कडून 50000 चेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

   यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, शंभूराजे जगताप, अभयसिंहराजे भोसले, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे,सहयाद्री ऍग्रो डेअरी चे रूट ऑफिसर हेमंत बन, राजेंद्र बारकुंड, सर्व दूध संस्थांचे चेअरमन व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

litsbros

Comment here