आम्ही साहित्यिक

🌹🌹🌹🌹🌹 शिदोरी 🌹🌹🌹🌹🌹

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹🌹🌹🌹 शिदोरी 🌹🌹🌹🌹🌹

                        ————

     आता बघा प्रवास म्हटला की थोड्या अंतराचा असेल म्हणजे दोन चार तासाचा तर गरज लागते ती चहापाण्याची नाहीतर नाश्त्याची तर त्याचं काय झालं नाश्ता ती पण प्रवासातला म्हणलं तर फाट्यावर पाच दहा मिनिटं एस टी उभा राहिल्यावर ताबडतोब मिळणारा पदार्थ म्हणजे वडापाव परंतु प्रवास जर जास्त वेळेचा असेल तर दुपारच्या जेवणाची सोय करावी लागते म्हणून बघा पहिली काय आपल्या प्रवासाच्या वाटेवर जास्त हॉटेलं उपलब्ध नव्हती मग प्रवास एस टी चा असो…रेल्वेचा असो… नाही तर बैलगाडीचा असो अन तरीपण प्रवास जर 8-15 दिवसाचा असल तर आता प्रश्न उभा राहतो एवढा काय प्रवास असतोय व्हयं तर त्याचं काय नुसता प्रवासच नाही तर प्रवास करणे म्हणजे आठ पंधरा दिवस घराबाहेर पर मुलुखाला राहणे आले तर आज प्रवासाला नेलेली भाजी भाकरी उद्या खराब होते विटते त्यासाठी घरातली मंडळी गोड दशम्या… शंकरपाळी…करंजी… लाडू…शेव…चिवडा… असं चार-आठ दिवस टिकणारं सामान त्याच्याबरोबर देतात व त्याला पण शिदोरी असं म्हणतात.

     पण खरा शिदोरी या शब्दाचा अर्थ बघितला तर मुलीचं लग्न झाल्यावर सासरी जाताना ते वैभव वेगळं वाटतं पण सासरी गेल्यावर तिकडे सोळावा वगैरे धार्मिक विधी झाल्यावर पुन्हा माहेरी पाठवलं जातं दोन-चार दिवस राहून पुन्हा सासरी जाताना एक टोपली त्याला दुरडी म्हणतात त्यामध्ये लाडू…करंजी… पुरणाच्या पोळ्या…गोल पुरीमध्ये शिरा भरून त्याला सांजोरी म्हणतात… असे दोन चार दुरड्या भरून सासरी पाठवलं जातं तर या दुरडीच्या प्रकाराला सुद्धा शिदोरी असे म्हणतात तिकडे गेल्यावर या दुरडीच्या प्रकाराला एका घरगुती स्वरूपाच्या छोट्या कार्यक्रमांमध्ये गल्लीतल्या काही बायांना बोलावून शिदोरीची दुरडी खोलली जाते व प्रत्येक बाईला एक एक पुरणपोळी व थोडा गोड असणाऱ्या पदार्थाचा वानोळा दिला जातो असा शिदोरी चा शब्दशः अर्थ आहे आणि शिदोरीचा दुसऱ्या अर्थाने विचार केला तर आपण जेव्हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देतो तेव्हा त्यांच्याबरोबर आपण आवर्जून शिदोरी बांधून देतो अशी शिदोरी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला व गौरी गणपतीच्या गौरीना विसर्जनाच्या दिवशी दोरे घेण्याच्या वेळी देतो.

     ही शिदोरी गणपती बाप्पांना प्रवासामध्ये खाण्यासाठी व कैलासातल्या सर्वांना इथल्या पदार्थाचा वानोळा म्हणूनही दिला जातो प्रत्येक ठिकाणी या शिदोरीतले पदार्थ वेगवेगळे असतात पण सगळ्याच ठिकाणी बाप्पा बरोबर विशिष्ट पद्धतीने केलेले दही पोहे मात्र नक्की दिले जातात खरे तर शिदोरी म्हणजे घरातलेच पदार्थ जे बाहेर देऊन खायचे असतात शिदोरी या शब्दातच घरातला उबदारपणा साठवलेला आहे ही शिदोरी म्हणजे अगदी ऑफिसला घेऊन जायचा डबा असो किंवा आवळे भोजनासारखं गावाबाहेर केलेलं जेवण असो किंवा लांबच्या प्रवासाला जाताना बरोबर नेलेला फराळ असो तिथे अगदी घरचे सर्व पदार्थ पण लय भारी चवदार लागतात मग चार खास जास्त जातात मला तर शिदोरी म्हटली की एखाद्या शेतकऱ्याच्या कारभारणीने आणलेली शिदोरी आठवते कापडात बांधलेल्या पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या… त्यावर ठेवलेला मिरच्या हिरव्या मिरच्याचा ठेचा…दह्याचं लोटकं…भरली वांगी… सोबतीला भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा…आणि बुक्कीत फोडायचा कांदा…खरच लिहिताना सुद्धा माझी जीभ खवळते आहे खरं तर शिदोरीच्या किती तरी आठवणी लांबच्या रेल्वेच्या प्रवासात जेवणाच्या वेळी आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी डबे उघडले की होणारी देवाणघेवाण… सगळ्या पदार्थांच्या मिक्स झालेल्या चवी….त्यावेळी अगदी अनोळखी माणसही दोस्त बनतात

     शिदोरी ही प्रामुख्याने दोन प्रकारची म्हणजे जेवणाची लांबच्या प्रवासात नेण्यासाठी जेवणाच्या शिदोरीतले पदार्थ पाण्याचा अंश कमी असलेले म्हणजे पोळ्या… दशम्या… गोड किंवा तिखट गुळाच्या किंवा सुजीच्या पोळ्या… मिरच्याचा ठेचा… सुक्या चटण्या…लोणची… बटाट्याची सुकी भाजी…झुणका…प्रवासी पिठलं थापट वड्या…दही पोहे…दुसऱ्या प्रकारची शिदोरी म्हणजे फराळाची त्या शिदोरीमध्ये भाजलेले शेंगदाणे…तिखट मिठाच्या पुऱ्या… वेगवेगळे परंतु खरपूस भाजलेल्या पिठाचे लाडू… उडीद तांदूळ किंवा हरभरा डाळीचे निपट्टू म्हणजे चपट्यापुरा पुऱ्या…चिवडा… चकल्या…शेव… करंज्या…असा दिवाळी सारखा फराळ त्यामध्ये असतो हा वरील सर्व साज ग्रामीण भागातील आपला सैन्यात असलेला मुलगा रजेवर गावी आल्यावर व काही दिवसानंतर पुन्हा ड्युटीवर हजर होण्याच्या वेळी आई वडील त्याला हे एवढे पदार्थ शिदोरीच्या रूपाने देतात तसेच आपली मुलं परगावी दोन तीन दिवस सहलीसाठी जाताना सुद्धा आई-वडील कौतुकाने ही अशी शिदोरी बरोबर देतात खानदेशामध्ये शिदोरी देताना तेलच्या म्हणजे मोठ्या आकाराची पुरी असते त्यासाठी खपली गहू भाजून त्याचा खमंग रवा काढतात गुळाच्या दाटसर पाण्यामध्ये भिजवून त्या पाण्याला किंचितसे मीठ…सुंठ… जिरे आणि विलायची घालून रात्रभर गुळाचे पाणी पिऊन तो रवा चांगला फुलतो मग हाताला तूप लावून त्याचे लाडू करायचे पुणे मुंबईकडे हरभऱ्याची भिजवून वाटलेली डाळ…लिंबाचा रस… सुकं खोबरं घातलेली आंब्याची डाळ…तर कुठे वाटलेला हरभरा किंवा मुगाच्या डाळीचे किंवा बेसनाचे लाडू करतात

     उत्तर कर्नाटकामध्ये डाळ्याचे किंवा मुरमुऱ्याचे लाडू काही ठिकाणी ओलं खोबरं भाजून त्यामध्ये पिठी साखर टाकून पांढऱ्या शुभ्र करंज्या… कर्नाटकच्या किनारपट्टीवर अंबोडे नावाची चविष्ट भजी अशी भजी हरभरा डाळ भिजवून…मिरची…आलं… बडीशेप… कोथिंबीर घालून चपटी भजी त्याला आपण डाळ वडा असेही म्हणतो थापून खरपूस तेलामध्ये तळतात व तो शिदोरीच्या स्वरूपामध्ये दिला जातो कोकणामध्ये अळूच्या पानाच्या गाठोड्यात भात… काळ्या वाटाण्याचं सांबार आणि वडे असं ताजं जेवण पाहुण्यांबरोबर शिदोरी म्हणून प्रवासात खाण्यासाठी देतात कडक सोवळे ओवळे पाळणारे लोक मात्र कच्चा शिधा बरोबर नेऊन एखाद्या थांब्यावर चूल मांडून स्वयंपाक करतात त्यांच्याबरोबर तुपात भाजलेला कोरडा शिरा किंवा उपीट असतं गरम पाणी घातलं की इन्स्टंट पदार्थ तयार होतो असं त्याचं स्वरूप असतं काही ठिकाणी नुसती फळं बरोबर देतात एवढेच काय केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची… त्याचप्रमाणे महामंडळं…वित्तीय संस्था…आदी ठिकाणी कामगारांची इमाने इतबारे केलेली सेवा लक्षात घेऊन त्यांना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी म्हणजे पेन्शन देऊन त्यांचं वर्धक्याकडे झुकलेलं जीवन सुसह्य करतात ती पण एक आयुष्याची शिदोरीचं असते

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

प्रेरणा… मा. श्री. प्रकाश छपरे साहेब… बेळगाव

*************************************

किरण बेंद्रे

पुणे

7218439002

litsbros

Comment here