करमाळासोलापूर जिल्हा

आवाटी येथील सबस्टेशन भुमीपूजन कार्यक्रम संपन्न; मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केले ‘हे’ आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी येथील सबस्टेशन भुमीपूजन कार्यक्रम संपन्न; मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केले ‘हे’ आवाहन

करमाळा(प्रतिनिधी);
आ .संजयमामा शिंदे करमाळा मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते , आरोग्य आदी विकासकामे अतिशय निष्ठेने व कर्तव्य भावनेने पार पडत असून जनतेही ही कामे स्मरणात ठेवावीत असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. आवाटी येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे भुमीपूजन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आदिनाथचे माजी संचालक तानाजी झोळ, आवाटीचे सरपंच शाबीर खान , बाजार समितीचे माजी संचालक महादेव धोंडे, नसरूल्ला खान, माजी जि . प सदस्य नानासाहेब नीळ , मांगी सोसायटीचे चेअरमन सुजीत बागल , दादासाहेब सांगडे, समाधान दोंड, तानाजी जगताप , महावीर साळुंके , भरत आवताडे , सुभाष बेडकुते,वीज कंपनीचे इंजी. श्री गलांडे उपस्थित होते .

याविषयी अधिक बोलताना माजी आमदार जगताप महादेव की, आ .शिंदे यांनी आवाटी येथील सबस्टेशनचे काम केल्यामुळे या भागातील जनतेचा वीजेचा फार महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

आ . शिंदे मतदारसंघातील सर्वच कामांचा पाठपुरावा योग्य रितीने करीत असून कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही याची ग्वाही आ .शिंदे यांचेवतीने मी देतो आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली विकास कामे लक्षात ठेवा आणि 2024 साली आमदार शिंदे यांना पुन्हा एकदा आमदार करण्याची आपली जबाबदारी आहे याचेही भान असू द्या असे आवाहन त्यांनी केले .

हेही वाचा – भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

हलक्यांचा कडकडाट व टाळ, मृदुंग, पखवाज यांच्या गजरात रेल्वे थांबण्यासाठी पारेवाडी येथे भव्य मोर्चा

या प्रसंगी आ. संजय मामा शिंदे यांनी 2020 ते 23 या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा मांडला.

डिकसळ पुल , जातेगाव टेंभुर्णी रस्ता , कुटीर रुग्णालयातील मंजुर सुविधा , रस्ते उभारणीसाठी चा मंजूर निधी , स्थगीती उठविलेला विकास नीधी आदी बाबींचा आढावा देत आणखी काही मंजूर कामाच्या निधीला दिलेली स्थगिती उठवणेसाठी न्यायालयात जाणार असल्याचे देखील सांगीतले .

litsbros

Comment here