आम्ही साहित्यिकपुणेमहाराष्ट्र

***** डोक्याला नव्हं भांड्याला कलई *****

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

***** डोक्याला नव्हं भांड्याला कलई *****
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तसं बघायला गेलं तर तवा आमचा मुक्काम पोमलवाडीला होता आता पोमलवाडी म्हणजे दोन टप्प्यात वसलेली पावन नगरी त्यातली अर्धी आई पोमाईच्या सानिध्यात अन अर्धी राहिलेली हनुमंताच्या सानिध्यात अन अवतीभवती पार वाड्या वस्त्यावर पण सगळा गावचा कारभार चालायचा याच बांधावरून म्हणजे ग्रामपंचायत…थोडीशी अंगापूरती बाजारपेठ… म्हणजे बघा एखादं कापड दुकान… दोन-चार किराणा दुकानं…चार हाटीलं…एक दोन पान पट्ट्या… कासार…टेलर… न्हावी…सोनार… कुंभार… सुतार…सगळं इथे मिळायचं
आठवडी बाजार…वडाखालचा संभा चांभार… आणि गारीगार वाला गुंजाळ… त्या दोन पिठाच्या गिरण्या… गावाचा एकुलता एक डॉक्टर… एक जित्राबाचा डॉक्टर…परिसरामध्ये योगायोगाने काही पाहुणेमंडळी आली तर गाव जाग व्हायचं म्हणजे जवळ जवळ थोराडं आणि पोरं बाळं त्याच्या भोवतीच बस्तान बसवायचे म्हणजे प्रत्येकाला कोडं पडलं असलं असं काय वेगळं हाच तर कवाणूक एकदा तो स्टोव्ह रिपेरवाला.. छत्री रिपेरवाला आला तर त्याचं इंजीनियरिंग कौतुक पार डोकं घालून बघायची असाच एक पाहुणा म्हणजे भांड्याला कलई करणारा आला म्हणजे बायको…तान्ह पोर जवळ… आई…आणि एखादा नुकताच हाताशी आलेला भाऊ नाहीतर पोरगा… त्यांचा तो सोहळा गावामध्ये कमीत कमी आठवड्याभर तरी चालायचा
गावातल्या पोरांना आणि बाप्यांना एक टाईमपासच ठिकाण जवळपास होतं मारुतीच्या देवळाजवळ वडा पिंपळाची दोन-चार झाडं होती त्या झाडाच्या दाट सावलीत एक पाल… भाता… दोन-चार सांडश्या… चिमटे…असं नवसागर कथिल अजून काहीतरी कलईच्या कच्च्या मालाचा पसारा मांडून हा बसलेला असायचा त्यामध्ये खरा कलाकार एकच होता त्याच्या हातात जादू होतील एखाद्या ठोक्याच्या पितळी पातेल्याकडे बघितल्यावर दोन दिवस जेवण जाणार नाही असं पार कळकटलेलं अन अडगळीतले पातेलं जरा वेळ भात्यातल्या इस्त्यावर ठेवून पहिली नवसागराची फवारणी करून पांढऱ्या धुराचा लोट काढून ती कथिलाचं वेटोळं दिमाखदारपणे त्याच्यावर दोन-तीन ठिकाणी टेकवून ठिपके पाडायचे कापडाच्या बोळ्यांनी त्या तापलेल्या पातेल्यावर घासून फिरवायचं खरंच मनात भराय सारख पातेलं दिसायचं त्या हाताची कमाल म्हणावी लागेल त्याचा पेहराव म्हणावा तर लाकडी किडक्या कोळशाच्या तडाक्यात सापडल्यावर ठिणग्यांचा वर्षाव अंगावर व्हायचा आणि म्हणून पायजम्याची चाळण झालेली असायची असा तो भांड्याला चांदीचे रूप देतोयं


कोणत्या पण भांड्याचं कसयं आता तुम्ही म्हणाल आता कुठं पितळेची भांडी दिसतात पण हा काळ आहे 1975 च्या अगोदरचा तवा लई करून जर्मल आणि पितळच असायचं एखाद्याचं सधन तांब्याचा बंब दिसायचा आणि तेवढचं त्याचं कौतिक असायचं भांडी म्हटलं तर जर्मनची नाहीतर पितळेची ताटं… ग्लास…चमचे… कढई… तवा तर लोखंडाच्याच असायच्या…काठवट तेवढी लाकडाची असायची…गावच्या गिरणीत कवा तरी अवसं पुनवला एखादा दहा-वीस किलो दळणाचा जर्मनी नवा कोरा चकचकीत डबा शाळा मास्तर…बंडिंगचे साहेब…नाहीतर इरिगेशनच्या पाटकऱ्यांच्या घरचा असायचा…दळण्यासाठी आलेला दिसायचा नाहीतर आपलं वैदू कडून बिस्किटाचे चौकटी डबे त्याला झाकण हँडल आणि कडी कोंडा करून घेतलेला
घरात असणाऱ्या तुटपुंज्या भांड्यांना कलई व्हायची अख्खा गाव आलटून पालटून कलई करून घ्यायचा ह्या गडबडीत दहा पंधरा दिवसाचा त्या रोजंदार चालू असायचा आणि गाव जिवंत असल्यासारखं वाटायचं आणि आता आपण भांड्याबद्दल बोलू भांड्यांची कलई म्हणजे थोडक्यात स्वयंपाक घरात तवा काय स्वयंपाक घर नसायचं पडवी किंवा आतलं घर म्हणजे किचन त्याचं नूतनीकरण व्हायचं म्हणजे पितळेची भांडी आपसात म्हणायची आपलं काय बुवा नवे नवे कपडे स्वच्छ साबण लावून आंघोळ आणि फ्रेश झाल्यासारखं वाटतंय कारण त्या प्रत्येक पातेल्याला आणि कढईला मनोमन वाटायचं आजींनी आम्हाला किती हौसेनं दुकानातून खरेदी करून आणलं होतं आम्हाला प्रत्येकाला घरामध्ये एक मानाचं स्थान होतं स्वयंपाकासाठी…पाणी साचवायसाठी…वस्तू भरून ठेवण्यासाठी…अन्न शिजवून दमल्या भागल्या जीवाच्या पोटात चार घास सुखानी घालायचे आमचं काम…खरंच स्वयंपाक घरामध्ये काम करताना त्या प्रत्येक भांड्याला धन्य धन्य वाटायचं मजेचे होते ते दिवस सणासुदीला बासुंदी…खीर…कोजागिरीला मसाल्याचे दूध… यांनी ते बिचारे न्हावून निघायचे


भरली वांगी…पंचामृत…डाळिंबी…डाळीची आमटी… यांच्या नुसत्या वासाने मन कसं तृप्त व्हायचं खरंतर त्या पदार्थांना गरम राहण्यासाठी सारखं भांड्यांना चुलीवर जावं लागायचं त्याच्यामुळे ते सारखे रागाने लालबुंद झाल्यासारखे वाटायचे पण आलेले पाहुणे बोटं चाटून जेवलेली आजीने आम्ही भांड्यांनी पाहिले त्या भांड्यांना खूप बरं वाटायचं घरातील कारभारीन सुनेचा…नाहीतर लेकीचा सुटवडा डिकवडा…आणलेला किराणामाल… सांभाळण्यासाठी यांच्याकडे दिला जायचा… आणि प्रत्येक घरात त्याची छान बडदास्त ठेवली जायची आठवड्यातून एकदा दोनदा तरी चिंच मीट लावून लख्ख घासून घेतलं जायचं स्वयंपाक घरातली फळी चकचकीत दिसायची वर्षातून एकदा तरी जीर्णोद्धार केल्यावाने कलईवाल्याच्या स्वाधीन केलं जायचं आणि पुन्हा नवी जिंदगी सुरू व्हायची तो कलई वाला आगीच्या तोंडी द्यायचा पहिले चांगला भाजून काढायचा लालबुंद करायचा नंतर आतून नवसागराचा फवारा मारायचा त्या पांढऱ्या धुराच्या वासाने श्वास कोंडला जायचा आणि मग आतल्या बाजूने चकचकीत अशी कलई लावायचा त्यात चंदेरी रंगाच्या कलई मुळे प्रत्येकाला नवा झगा घातल्यासारखं वाटायचं आता त्या पडवीच किचन झालय पितळेच्या जागी स्टील आलय निर्लेप बजाज आले काचेची सिरॅमिकची भांडी फळीवरून कपाटात जागा पटकावून बसली पण एक मात्र खरे पुन्हा जुना जमाना आला आहे ही जरी वास्तव असलं तरी आत्ताच्या पिढीला जनरेशनला चुलीवरचं परत सगळं आवडायला लागलयं.


पहिलं चड्डी फाटली आणि जोडायला ढिगळ लावायसाठी चार बोटं किंवा वितभर अजून कापड मिळत नव्हतं म्हणून फाटलेली चड्डी घालून हिंडावं लागायचं एक प्रकारे गरीबीची आणि तुटपुंजे पणाची जाहिरातच व्हायची जणू पण आजचं जनरेशन मात्र गुडघ्यावर मागच्या बाजूला फाटलेली जीर्ण झालेली जीन पॅन्ट फॅशन आयकॉन म्हणून तिप्पट चौपट किमतीला मॉल मधून घेऊन घालतात श्रीमंताचे लक्षण समजतात आणि विचारलं तर म्हणत्यात आम्ही लई शिकलो आहोत अहो तुम्हाला ऋतू कळतो का ऋतू इथं उन्हाळ्यात 35 डिग्री सेंटीग्रेट तापमानामध्ये धोतराला गरम होतंय तिथं तू जीन पॅन्ट घालतोय तुला काय ऋतू कळतो का आणि म्हणतोयं आम्ही लई शिकलोय कलईचं एक वैशिष्ट्य म्हणजे तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना आतून कथिलाचा पातळ थर देण्याची एक प्रक्रिया आहे अल्युमिनियमच्या किंवा बहुतेक स्टीलची भांडी तवा अस्तित्वात येण्याच्या अगोदर तांब्या पितळेची भांडी वापरामध्ये होती भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवलेला विशेषता आंबट पदार्थ म्हणजे कडी…चिंच… आमसुलाचे वरण… पंचामृत… ताक…दही…हे असले पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होऊन खराब होऊ नये म्हणून म्हणजे कळकु नये म्हणून त्याला कलई केली जायची आणि त्या प्रक्रिया साठी भांड त्या जाळावर लालबंद होईपर्यंत तापवायचं त्यावर आतून नवसागर फवारायचा आणि कपड्याने आतल्या बाजूला सर्व लावायचा.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ सरपंचाला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी; अज्ञाता विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा केले

🏝️🏝️🏝️ खंडाळ्याचं फूड कोर्ट 🏝️🏝️🏝️

उष्णतेमुळे नवसागरामधून अमोनिया वायू बाहेर पडून भांडं स्वच्छ व्हायचं नंतर भांड्याच्या आतल्या बाजूने कथिलाची रेघ मारून ती कपड्याच्या सहाय्याने भांड्याच्या आतील सर्व पृष्ठभागावर जोरात घासून फिरून कथिलाचाअत्यंत पातळ थर निर्माण केला जायचा अशी कलई लावल्यानंतर लगेच भांडं थंड पाण्यात बुडवले जायचं त्यामुळे कलई कशी चकचकीत व्हायची आणि त्या भांड्यात ठेवलेले पदार्थ कळकत नसायचे काही दिवसानंतर ती कलई उडून गेल्यावर पुन्हा कलई करावी लागायची आता आजच्या पुरता विचार केला तर एक काळ असा होता कलईच काम संपता संपत नव्हतं पण मात्र आज घरोघरी फिरून पोटाला पोटापुरता व्यवसाय मिळत नाही हातात कला असून सुद्धा मोल मजुरी करावी लागते
*****************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here