आम्ही साहित्यिक

🏝️🏝️🏝️ खंडाळ्याचं फूड कोर्ट 🏝️🏝️🏝️

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🏝️🏝️🏝️ खंडाळ्याचं फूड कोर्ट 🏝️🏝️🏝️

                    *******************

                   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

       आज ही कथा लिहिण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हे बघा 2021 उजाडताच माझ्या काही शारीरिक त्रासामुळे मला मुंबईला भायखळा येथे रेल्वे दवाखान्यात साधारण बारा दिवस ऍडमिट झाल्यावर डॉक्टरांनी मला दर 21 दिवसांनी एक याप्रमाणे भायखळ्याच्या रेल्वे दवाखान्यात येऊन एक तासासाठी ओ पी डी मध्ये ऍडमिट होऊन सलाईन द्वारे केमोथेरपी घेण्यास सांगितलेली होती जाताना मी बाय रोड असं जात असे आणि हे सर्व दुपारी दोन वाजेपर्यंत उरकलं जायचं परतीचा प्रवास करताना येताना रोडवरील हॉटेलमध्येच जेवण वगैरे करून साधारण पाच वाजेच्या दरम्यान खंडाळा ते लोणावळा दरम्यान पुण्याला येण्याच्या लेनवर ही खाऊ गल्ली म्हणजे पक्क्या स्वरूपातील खाण्यापिण्याची स्टॉल्स व दुकाने यांनी जणू भरगच्च बाजारपेठ वाटावी अशी नयनरम्य वातावरणातील छोटीशी बाजारपेठ

        सभोवताली सगळीकडे दुचाक्या कार व बसेस पार्क केलेल्या सर्व प्रवासी आवडीच्या पदार्थावर यथेच्छ ताव मारीत असायचे त्यामध्ये चायनीजचे डोशासारखे कच्छी दाबेली आईस्क्रीम तसेच जेली चॉकलेट चिक्की कोल्ड्रिंक्स इत्यादी पदार्थांचे भरपूर स्टॉल्स लागलेले असायचे पण त्याच एरियामध्ये जास्त करून कातकरी म्हणजे दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक दोन-चार पाट्यामध्ये वेगवेगळा रानमेवा घेऊन बसलेले दिसायचे खरं म्हणजे जांभूळ आणि करवंद तसंच विलायची चिंचा सोडल्या तर सगळी फळे मी पहिल्यांदाच बघत होतो आणि त्याचं नाव पण कुठलं माहित नसायचं जे दिसल ते आधाशासारखं खरेदी करायचं आणि त्यांची ती फळं देताना पळसाच्या किंवा मोठ्या आकाराच्या पानात देण्याची व्यवस्था म्हणजे सर्विस असायची कागद किंवा कॅरीबॅग अजिबात नाही त्यामुळे हुबेहूब जंगली लुक आणि फील वाटायचा पुन्हा थोडसं पुढे आल्यावर सर्विस रोडने लोणावळ्यामध्ये पुन्हा चिक्की जेली जाम खरेदी करून पुण्याला यायचं पण सहज बसल्यावर त्या वातावरणाची आठवण झाली

        कारण एवढ्या आठवड्यामध्ये उन्हाच्या जरा झळया जाणवायला लागल्या तवा पुन्हा या प्रसंगाची आठवण झाली आणि खूप दिवसापूर्वीचे म्हणजे शालेय जीवनातले थोडेसे दिवस आठवले कारण आमच्या लांबच्या नात्यातील एक कुटुंब जुन्या पुणे मुंबई हायवे त्यावेळी एक्सप्रेस हायवे नव्हता त्या हायवेवरील तुंगारली गावाच्या अलीकडे थोडीशी एक त्यांची वस्ती वसलेली होती तिथेच वडिलोपार्जित शेती पण होती आणि त्या कुटुंबाच्या सानिध्यात दोन-चार दिवस घालवण्याचा योग आला तेव्हा त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या तवा म्हटलं जरा थोड्या रानमेव्याबद्दल सांगावं कारण या रानमेव्याचं अन आपलं काय जसं अतूट नातं असल्यावानी खरं म्हणजे कोकणपट्ट्याच्या या निसर्गाने प्रत्येक मोसमा मध्ये आपल्याला वेगवेगळ्या रानमेळ्याचा खाऊ दिला आहे पण तो आयता फार कमी वेळ मिळतो त्यासाठी प्रयत्न व मेहनत ही करावी लागते कधी झाडावर चढून तर कधी झाडाला लोंबकळून कधी विनम्रतेने खाली वाकून तर कधी चक्क सरपटत जाऊन तेथील रहिवासी तो रानमेवा मिळवतात क्वचित कधीतरी ठेचकळतात खरचटतात पडतात पण नेहमी ते सदैव आनंदी असतात मनमुराद हसतात साधारण मे जूनच्या कालावधीमध्ये आकाशात मळभ दाटून येऊन पावसासाठी वातावरण तयार झालं की आजही वयाच्या साठी मध्ये त्या शालेय जीवनाच्या आठवणी जाग्या होतात

        दीड दोन महिने मनसोक्त आंबे फणस करवंद जांभळं खाऊन तृप्त झालेले शाळेच्या तयारीला लागायचे शाळेत जाताना पाऊस सोबतीला कधीकधी असायचा त्यात त्या आमच्या पाहुण्यांचं हिरवगार गाव आणि शाळेत जाणारी ती रानवाट आंबे काजू करवंद जांभळं हसोळी भेडसे छोटे पेरू आवळे चिंचा यापैकी काही ना काही रानमेवा कायम उपलब्ध असायचा पण त्या पावसाच्या महिन्याभरामध्ये रानमेव्याच्या या शोधात आम्ही पण असायचं रात्रभर पाऊस जोरदार पडल्यानंतर पहाटं पहाटं आंब्याच्या झाडाखाली गेल्यावर तर आंब्याची रासच पडलेली असायची रात्रभर पडून गेलेला पाऊस भिजलेली थंडगार जमीन मातीचा पसरलेला गारवा पक्षांचा किलबिलाट प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घ्यावा

        आणि पाऊस पडून झाल्यावर आठ पंधरा दिवसांनी काजूच्या झाडाखालून फेरफटका मारून झाल्यावर खाली पसरलेल्या ओल्या तपकिरी पाला पाचोळ्या मध्ये पोपटी पाती अचानक चमकताना दिसतात उन्हाळ्यामध्ये नजर चुकीने राहिलेल्या काजूच्या बिया फोडून ह्या मखमली पोपटी मधून कधी कधी हिरवागार काजूगर वर यायचा त्यातून बाहेर पडणारा छोटासा अंकुर दिसायचा हा लोभसवाना अंकुर चवीला गोडसर तुरट आणि करकरीत नेहमीच्या काजूपेक्षा जराशी वेगळा लागायचा चिंचेच्या झाडाखाली क्वचित एखादा चिंचुक्याचा अंकुर पण दिसायचा त्यावेळी कच्चे भाजलेले रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजवून गरम केलेले चिंचोके खाण्यात काय ती मजा आणि मी पण निसर्गाच्या सानिध्यात न्हाणीत कधीतरी भाजलेल्या फणसांच्या आठळ्या त्याच काळात चिंचेला फुलं पण यायची ती फुलं त्याला आपण फुलवरा म्हणतो कोवळी लुसलुशीत पानं चवीला खूप छान लागायची 

       कधी कधी झाडाला लागलेला एखादा चुकार आंबा पण दिसायचा दगड मारून काठीनं किंवा झाडावर चढून तो आंबा मिळवायचं एवढ्या प्रयत्नानंतर मिळालेला तो आंबा खूपच गोड लागत असे भेडसाच्या झाडावरील तपकिरी भेडसे आवळ्याच्या झाडाखाली पडलेले फ्लोरेशन कलरचे आवळे पेरूच्या झाडावर लगडलेले कोवळे पेरू असं कितीतरी सांगावं दुसरा मनात भरण्यासारखा पदार्थ म्हणजे करवंदाची जाळी काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळीच्या डहाळी भरून आलेल्या दिसायच्या सर्वत्र साधारण रानमेवा म्हणजे करवंद जांभूळ फणस आंबा आवळा राय आवळा तोरण आंबोळे आहेत आणि हा रानमेवा आरोग्य रक्षणासाठी आवश्यक हवा खर्च न करता ही अतिशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमाणात दिसते करवंदाचं मूळ स्थान भारतामध्ये असून करवंदाला हिंदी मध्ये खट्टा मीठा या नावाने ओळखतात शास्त्रीय भाषेमध्ये त्याला उवाउर्सी या नावाने ओळखले जाते या प्रकाराचे करवंदाचे लोणचे चटणी करवंद फळाची भाजी करवंदाचे सरबत मोरंबा जाम जेली आणि वडी या स्वरूपात उपलब्ध असतात

        एका दृष्टीने बघितलं तर हजारो वर्षापासून चालत आलेली रानमेवाची परंपरा काळाच्या ओघात बदलत गेली असती तरी आदिवासी समाजामध्ये अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्व कमी झालेलं दिसत नाही रानावानामध्ये किंवा अति दुर्गम भागात वास्तव्य करून राहिलेला आदिवासी समाज अनेक गोष्टीवर आपली उपजीविका चालवतात त्यामुळे आदिवासींना हंगामी रोजंदाराचे साधन उपलब्ध होतं सफरचंद संत्री हमेशा खरेदी करणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसून येतात खेड्या-पाड्यातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळं विकायला बसलेल्या थंडगार झाडाच्या सावलीत आणि रस्त्याच्या दुतर्फा दिसतात दिवसे दिवस वाढणाऱ्या उकड्यांमध्ये ही फळं खूप लाभदायक ठरतात कारण नेहमीची सफरचंद संत्री मोसंबी केळी आंबा टरबूज चिकू या पदार्थावर मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते त्यामुळे काही वेळा ही फळं घातक वाटतात पण या रानमेळ्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे कारण हा रानमेवा थेट झाडावरून पानामार्फत आपल्या हातात असतो

        साधारणपणे 10 रुपयाला एक करवंदाचा वाटा गिराईक पण अगदी खुशीने घेत आणि खुश होतं करवंद अन जांभळं अशीच विकली जातात एका मोठ्या टोपलीत साधारण 50 ते 60 वाटे असतात त्यानुसार दिवसभरात त्यांना साडेचारशे ते पाचशे रुपये रोज सुटतात तसेच दुसरे म्हणजे पाणीदार ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात आदिवासी समाज पूर्वापार ताडगोळ्यांचा वापर करीत आलेला आहे काही घटकांनी यास व्यावसायिक रूप देऊन व्यवसायामध्ये क्रांती केली व भरपूर प्रमाणामध्ये सेवा उपलब्ध करून दिली शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवून उष्णता कमी करण्यासाठी रानमेवा एक प्रकारचे वरदान ठरत आहे सध्या त्या भागामध्ये ताडगोळे भरपूर प्रमाणात मिळत आहेत एवढेच काय पुणे मुंबई रोडवर रस्त्याच्या बाजूने खडकी पिंपरी चिंचवड परिसरात अजूनही रस्त्याच्या कडेने भरपूर प्रमाणात ताडगोळे विकणारे आढळतात हे ताडगोळे साधारण 60 ते 100 रुपयाला डझन प्रमाणे मिळतात

############################

किरण बेंद्रे

मांजरी… पृथ्वी हाईट्स… पुणे

7218439002

litsbros

Comment here